- सूरत के PT टीचर ने अपने दो बेटों को जहर देकर हत्या करने के बाद खुद फांसी लगाकर आत्महत्या की.
- मृतक ने अपनी पत्नी पर विवाहेतर संबंधों का आरोप लगाते हुए सुसाइड नोट और डायरी में अपने दर्द को व्यक्त किया.
- पुलिस ने पत्नी फाल्गुनी और उसके प्रेमी नरेश राठौड़ को आत्महत्या के लिए उकसाने के आरोप में गिरफ्तार किया.
Surat PT Teacher Suicide Case: दोन आणि आठ वर्षांच्या मुलांची हत्या केल्यानंतर एका पीटी शिक्षकाने गळफास घेत आत्महत्या केली. ज्या बापाच्या खांद्यावर बसून मुलं खेळत होते, त्याच बापाने मुलांचा जीव घेतला. मुलांची हत्या केल्यानंतर त्यांनी स्वत: गळफास घेतला. ही घटना गुजरातमधील सूरतमधून समोर आली आहे. या घटनेच्या तपासणीदरम्यान पोलिसांनी मृत व्यक्तीच्या घरातून दोन डायरी आणि सुसाइड नोट सापडली. या दोन डायरीमधील एका 400 पानांच्या डायरीमध्ये व्यक्तीने आपल्या पत्नीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे सुसाइड...
सुरतच्या जिल्हा पंचायत क्वार्टरमध्ये राहणारे पीटी शिक्षक अल्पेश सोलंकी यांनी त्यांच्या 2 आणि 8 वर्षांच्या मुलांना विष दिलं अन् नंतर गळफास घेत आत्महत्या केली. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली, ज्यामध्ये मृताने पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे हे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे.
आरोपी पत्नी फाल्गुनी आणि पति अल्पेश सोलंकी.
मृत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर अटकेत...
पोलिसांनी या प्रकरणात मृत अल्पेशची पत्नी फाल्गुनी आणि त्याचा प्रियकर कृषी विस्तार अधिकारी नरेश राठोड याला अटक केली आहे. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नरेश राठोडने चौकशीदरम्यान फाल्गुनीशी संबंध असल्याचं मान्य केलं आहे. याशिवाय फाल्गुनीनेही पोलिसांकडे रडत रडत आपली चूक मान्य केलं. अल्पेश माझ्यावर संशय घेत होता आणि यामुळे त्याचं दारू आणि सिगारेटचं व्यसन वाढलं होतं.
डायरीमध्ये पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाचा उल्लेख...
पोलीस तपासात अल्पेशची सुसाईड नोट आणि डायरी सापडली होती. ज्यात पत्नी फाल्गुनीच्या कार्यालयातील नरेश राठोड नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध आणि लहान मुलाच्या पितृत्वाबाबत संशय असल्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी अल्पेशची पत्नी आणि त्याच्या प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर
सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा...
अल्पेश हा सुरतमधील एका शाळेत पीटी शिक्षक होता. तर त्याची पत्नी फाल्गुनी जिल्हा पंचायत शिक्षण विभागात वरिष्ठ लिपिक होती. दोघांचाही १० वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये अल्पेशने लिहिलं होतं की, फाल्गुनीचे ऑफिसमधील नरेश राठोडसोबत अनैतिक संबंध होते.
पत्नी म्हणायची, मरायचं तर मरा..मला माझ्या मर्जीने जगू द्या..
यावरुन दाम्पत्यामध्ये सतत वाद होत होता. त्यांचा दुसरा मुलगा अल्पेश त्याचा मुलगा आहे की नाही याबाबत अल्पेशने संशय व्यक्त केला होता. दोघांमध्ये वाद झाल्यावर फाल्गुनी म्हणायची, तुला मरायचं असेल तर मर. पण मला माझं आयुष्या माझ्या इच्छेने जगू दे.
आरोपी नरेश राठोड
५-६ पानी सुसाइड नोट...
मृताच्या भावाच्या तक्रारीवरून अल्पेशची पत्नी फाल्गुनी आणि तिचा प्रियकर नरेश कुमार राठोड यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पेशच्या घरी सापडलेल्या डायरीमध्ये गेल्या दोन महिन्यांतील कहाणी आहे. त्यात बालपणापासून आतापर्यंतच्या प्रमुख घटनांची माहिती देखील आहे. ही सुसाइड नोट पाच ते सहा पानांची आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाल्गुनीचा प्रियकर नरेश याचं लग्न झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे. मात्र काही वर्षात त्यांचा घटस्फोट झालं. यानंतर त्याने दुसरा साखरपुडाही केला होता. मात्र हे नातं लग्नापर्यंत पोहोचलंच नाही. तर दुसरीकडे नरेश आणि फाल्गुनी हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून नातेसंबंधात आहेत.