Swargate bus depo Crime : स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांचे सहाय्यक वकील साहिल डोंगरे यांचं अपहरण करून दिवे घाटात नेऊन चोप दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र या प्रकरणात आता वेगळीच माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे यांच्या वकिलाचे सहाय्यक वकील साहिल डोंगरे यांचं अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून समोर आल्या होत्या. त्यांना मारहाण झाल्याचंही सांगितलं जात होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल डोंगरे यांचे अपहरण करून त्यांना 20 ते 22 लोकांनी मारहाण करून दिवे घाटात टाकून दिले बाबत प्रसार माध्यमांवर बातमी फिरत होती. याप्रकरणी तपास केला असता साहिल डोंगरे हे रात्री सागर बार येथे रात्री 10 वाजता त्यांचे मित्र अनिकेत मस्के सोबत दारू पिऊन बाहेर पडताना दिसत असल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आलं आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साहिल डोंगरे रात्री 11.30 वाजता व पहाटे 05 वाजता दिवे घाट परिसरात असल्याचं दिसून आले. 108/112 या क्रमांकावर सासवड पोस्ट येथील अंमलदारांना कॉल आला होता. पोलिसांच्या कंट्रोल रूमला एकाचा अपघात झाला असून तो बेशुद्ध असल्याचा फोन आला होता. त्यानंतर हा खुलासा झाला. अपघातावेळी डोंगरे कार चालवित होते की नाही याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
नक्की वाचा - Drugs Smuggling : पाकिस्तानातून ड्रोनने मागवायचा ड्रग्ज, ठिकाणही ठरलेलं; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
इतकचं नव्हे तर डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचे पहाटे 108 वर फोन करून सांगितलं. त्यानंतर पुन्हा ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड येथील डायल 108 ॲम्ब्युलन्स आली व जखमी साहिल डोंगरे यांना पुढील उपचारासाठी घेऊन गेले. यावरुन डोंगरे यांचं कोणत्याही प्रकारे अपहरण झालं नसून त्यांचा रस्ते अपघात झाला आहे असं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.