Pune Rape Case : ...तर दत्ता गाडे सापडलाच नसता; काय होता स्वारगेट अत्याचारातील नराधमाचा प्लॅन B

Datta Gade Arrest Report: 24 तास नाकाबंदी, 250 पोलिसांचा फौजफाटा, तसेच ड्रोनच्या साहाय्याने त्याचा शोध सुरु होता. अखेर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. जाणून घ्या त्याच्या अटकेचा थरार..

जाहिरात
Read Time: 2 mins

 अविनाश पवार, पुणे: स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची भयंकर घटना घडली. घटनेच्या 72 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याला गुनाट गावातून अटक करण्यात आली आहे. 24 तास नाकाबंदी, 250 पोलिसांचा फौजफाटा, तसेच ड्रोनच्या साहाय्याने त्याचा शोध सुरु होता. अखेर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. जाणून घ्या त्याच्या अटकेचा थरार...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही. दत्ता गाडे रात्री नोतेवाईक महेश बहीरट यांच्या घरी साडे दहा वाजता आला. दत्ता गाडेने नातेवाईकांकडुन पाण्याची बाटली घेतली. आणि माझी मोठी चुक झालीय, मला सरेंडर करायचं असं सांगून तिथुन निघुन गेला. त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला. डॅाग स्कॅाडही त्याठिकाणी आणले.पोलिसांना त्याचा बदलेला शर्ट सापडला , त्याचा वास डॅाग स्कॅाडला दिला. ⁠त्याआधारे डॅाग स्कॅाडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला , पण गाडे ज्या ठिकाणावरुन आला होता तिथे परतलाच नाही.तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॅाल मध्ये झोपुन राहिला.

(नक्की वाचा- Pune Rape : ...तर 'ती' वासनेचा बळी झाली नसती! स्वारगेट स्थानकात सुरु होते 'हे' काळे धंदे; वाचा स्फोटक रिपोर्ट)

⁠याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी दत्ता गाडेला तत्काळ ताब्यात घेतले. ⁠दत्ता गाडे ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कुच केली. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं दत्ता गाडेला ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे दत्ता गाडे हा आत्महत्या करणार असल्याचेही समोर आले आहे. त्याच्या हातात किटकनाशकाची बॉटल होती. तो आत्महत्येच्या तयारीत होता. मात्र गावकरी आणि पोलिसांनी मोठ्या शिताफीन त्याला अटक केली.

Advertisement

दरम्यान, तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसने घरी गेला. त्यानंतर त्याने बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात सकाळी हजेरी लावली, तर दुपारी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले. त्यावेळी पोलिस आल्याचे पाहताच त्याने छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पलायन केले. त्याचा मोबाइल बंद झाल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या.  आज दत्तात्रय गाडे याला कोर्टात हजर केले जाणार आहे.