Swati Maliwal Case : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे PA बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणात ही कारवाई करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांची एक टीम शनिवारी मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचली होती. तिथं बिभव कुमार यांना अटक करण्यात आलीय. दुसरीकडं स्वाती मालीवाल आणि बिभव कुमार यांच्यातीत कथित मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. त्यामध्ये मुख्यमंत्री निवासस्थानातील सुरक्षा अधिकारी स्वाती मालीवाल यांचा हात पकडून त्यांना बाहेर काढताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्वाती मालीवल यांनी केलेला दावा खोटा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून आम आदमी पक्षाकडून करण्यात आलाय. 32 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये स्वाती मालीवाल यांना हात पकडून एका महिला सुरक्षा अधिकाऱ्यानं हात पकडून बाहेर घेऊन जात आहेत. या व्हिडिओमधील वेळ 13 मे रोजी सकाळी 9.41 मिनिटं असल्याचं दिसत आहे. यापूर्वी मोबाईलमध्ये शूट करण्यात आलेला एक व्हिडिओ समोर आला होता त्यामध्ये ऑडिओ देखील होता.
मालीवाल यांचा आरोप काय?
'आप'च्या खासदारांनी दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलला दिलेल्या जबाबात सांगितलं की, मी खोलीत प्रतीक्षा करीत होती. त्यावेळी बिभव आले आणि मला शिव्या देऊ लागले. काहीही कारण नसताना ते मला मारहाण करीत होते. मी आरडाओरडा करीत होते, पण तरीही ते मला मारहाण करीत होते. पुढे मालीवाल म्हणाल्या, बिभव कुमार तिला धमकी देत होते. मला मासिक पाळी सुरू असल्याचं सांगितल्यानंतरही ते शांत बसले नाही. त्यांनी मला पोटावर, छातीवर आणि चेहऱ्यावर वार केलं. कशी बशी मी तेथून पळून गेल्याचं त्या म्हणाल्या.
( नक्की वाचा : Video : '112 नंबरवर कॉल करेन..' केजरीवालांच्या घरी 'त्या' दिवशी काय घडलं? )
दिल्लीमधील एम्समध्ये स्वाती मालीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचा मेडिकल रिपोर्ट समोर आलाय. त्यामध्ये त्यांच्या पायावर तसंच चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली दुखापतींच्या खुणा आढळल्या आहेत.