Live Streaming Obscene Act :नवरा बायकोने मास्क घातले आणि बेडरूममध्ये गेले, नंतर जे केले ते जगाने बघितले

Live Streaming Obscene Act :पोलिसांना एका गुप्त माहीतगाराकडून या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली होती. पोलिसांनी या दोघांविरोधात IT Act अंतर्गत कारवाई केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
हैदराबाद:

या जगात पैसा कमावण्यासाठी काही जण वाट्टेल ते करायला तयार असतात. पैशांचा लोभ असलेल्या एका जोडप्याला हीच हाव नडली आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नवरा बायकोचे बेडरूममधील संबंध लाइव्ह प्रसारीत केले (Live Streaming Obscene Act) आणि ते अनेकांनी पाहीले. अश्लील मजकूर पाहणाऱ्यांची संख्या ही जगात कोट्यवधींमध्ये आहे. अनेकजण त्यासाठी पैसे देऊन अशा साईटचे सबस्क्रिप्शन घेत असतात. असा अश्लील कंटेट निर्माण करण्यात भारतीयही मागे नाहीत हे तेलंगाणात घडलेल्या या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. 

तेलंगाणा पोलिसांनी नवरा आणि बायकोला अश्लील व्हिडीओंचे थेट प्रसारण केल्याप्रकरणी अटक केली आहे  (Live Streaming Obscene Act). एका मोबाईल अॅपद्वारे त्यांनी आपले खासगी क्षण थेट प्रसारीत केले. हे करत असताना आपले चेहरे दिसू नये यासाठी त्यांनी तोंडावर मास्क लावले होते. हे जोडपं लाईव्ह प्रसारणासाठीच्या लिंक शेअर करायचे आणि आपले खासगी क्षण पाहाता यावेत यासाठी लोकांकडून पैसे घ्यायचे.  अश्लील व्हिडीओंचे थेट प्रसारण  (Live Streaming Obscene Act). केल्यारप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला पुरुष (41 वर्षे) हा ड्रायव्हर आहे आणि त्याची बायकोही य९37 वर्षे) सध्या अटकेत आहे. या दोघांनी पैसे कमावण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे मान्य केले आहे. पोलिसांना एका गुप्त माहीतगाराकडून या सगळ्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली होती. पोलिसांनी या दोघांविरोधात IT Act अंतर्गत कारवाई केली आहे. 

Advertisement

शिक्षकाची विद्यार्थिनींवर अश्लील व्हिडीओ पाहण्याची जबरदस्ती

हैदराबादमध्ये एका शिक्षकालाही पोलिसांनी अटक केली आहे. हा तेलुगु भाषा शिकवणारा शिक्षक असून त्याच्यावर विद्यार्थिनींना जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ पाहायला लावल्याचा आरोप आहे. वर्गात असतानाच त्याने विद्यार्थिनींवर ही जबरदस्ती केली होती. हा प्रकार डिसेंबर 2024 मध्ये घडला होता आणि तेव्हापासून तो फरार झाला होता. फेब्रुवारी महिन्यात त्याला अटक करण्यात आली होती. पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थिनींनी या शिक्षकाविरोधात तक्रार केली होती.  मधल्या सुट्टीमध्ये हा शिक्षक मुले बाहेर गेल्यानंतर मुलींना जबरदस्तीने वर्गात बोलवायचा आणि त्यांना हे व्हिडीओ पाहायला लावायचा असे पोलिसांनी सांगितले आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article