मनीष रक्षमवार, प्रतिनिधी
Telangana News : तेलंगणाच्या कुमरम भीम आसिफाबाद जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. कुमरम भीम आसिफाबाद जिल्ह्यात मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील चिंथलमनपल्ली मंडळातील गुडेम गावचा रहिवासी असलेला १५ वर्षीय लोकेश बुधवारी सकाळी घरी खेळत असताना दातांनी मोबाइल फोनची बॅटरी चावला. त्यानंतर असं काही घडलं की, अख्खं कुटुंब हादरून गेलं.
लोकेशचा चेहरा झाला विद्रूप...
मिळालेल्या माहितीनुसार, लोकेशच्या हातात बॅटरी होती. बॅटरीचा स्फोट झाला, ज्यामुळे गंभीर जखमांमुळे त्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मोबाइल फोनच्या बॅटरीच्या स्फोटामुळे लोकेशचा चेहरा आणि तोंड पूर्णपणे विद्रूप झाले होते. डोळे आणि कपाळ वगळता त्याच्या संपूर्ण चेहऱ्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते आणि गंभीर जखमांमुळे तो सतत ओरडत होता, परंतु बॅटरीच्या स्फोटामुळे त्याची प्रकृती इतकी गंभीर झाली की त्याचा जागीच मृत्यू झाला.
नक्की वाचा - महाराष्ट्र लॉजची एक खोली, रक्ताचे डाग; बंद दरवाजाआड भावा-बहिणीचं भयंकर पाऊल
१५ वर्षीय लोकेशसोबत घडलेली ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंब दुःखात बुडालं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अपघाताचे स्वरूप, बॅटरीचा प्रकार आणि इतर बाबींचा तपास सुरू केला आहे.