पाशवी कृत्य! नराधमाने केले श्वानावरच शौचालयात अत्याचार

एका बेवारस श्वानावरच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. शिवाय या घटनेचा प्राणी प्रेमींनी निषेध व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
ठाणे:

ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बेवारस श्वानावरच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. शिवाय या घटनेचा प्राणी प्रेमींनी निषेध व्यक्त केला आहे. एका प्राणी प्रेमीच्या सतर्कतेमुळे ही घटना उघड झाली. सुरूवातीला या प्रकरणाची तक्रार घेतली जात नव्हती असा आरोप प्राणी प्रेमींनी केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वर्तक नगर परिसरात सुप्रिया चाळके राहतात. या श्वानप्रेमी असल्याने त्या रोज रात्री श्वानांना मोफत खाद्य  पुरवतात. यामुळे त्या परिसरातील श्वान त्यांच्याकडे धावत येतात. मात्र 28 जून रोजी त्यांची नेहमीची श्वान राणीपरी ही त्यांना परिसरात दिसली नाही. त्यांनी राणी परीला हाका देखील मारल्या. त्यानंतर इमारतीच्या आणि बाजूलाच असलेल्या बँकेच्या वॉचमनला राणीपरी श्वानाची विचारपूस त्यांनी केली. त्यानंतर बँकेतील वॉचमनला राणी परी शौचालयातून  बाहेर येताना दिसली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'

इतकेच नव्हे तर राणीपरीचा शौचालयातून आवाज येत असल्याचे इमारतीच्या वॉचमनने सांगितले. इमारतीचा वॉचमन शौचालयात बघण्यासाठी गेला असता शौचालयाचे दार बंद होते. मात्र आतून श्वानाचा आवाज येत होता. शौचालयाचे दार ठोकल्यानंतर काही वेळात एक इसम राणीपरीसह बाहेर पडला. 'तुम्ही राणी परी बरोबर शौचालयात काय करत होतात' असे विचारताच इसम, 'ये तो मेरी भगवान है,' असं म्हणत तो बाहेर पळून गेला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - वजन कमी करण्यासाठी काय कराल? 'या' फळाचं करा सेवन 

मात्र घडलेला सर्व प्रकार वॉचमन ने सुप्रिया चाळके यांना सांगितला. सुप्रिया यांनी त्वरित घटनेचे गांभीर्य ओळखत राणीपरीला रुग्णालयात घेऊन गेल्या. तिच्यावर तिथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्थानक देखील गाठले. मात्र बराच काळ पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नसल्याचा आरोप प्राणीप्रेमी करताना दिसत आहेत. डॉक्टरांनी देखील राणीपरी या श्वानावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. हा प्रकार 28 तारखेला झाल्याने, जुन्या कायद्यानुसार अज्ञातावर कलम दाखल करण्यात आल्याची माहिती प्राणीप्रेमींनी दिली. दरम्यान 1 जुलैपासून  प्राण्यांवरील अत्याचाराचा कायदा रद्द झाल्याने  प्राणी प्रेमी खंत व्यक्त करत आहेत. लवकरात लवकर हा कायदा पुन्हा अमलात आणावा अशी मागणी प्राणी प्रेमी करताना दिसत आहेत. 

Advertisement