Thane News: कोर्ट आवारात सामूहिक अत्याचार प्रकरणात जबरदस्त ट्वीस्ट, दुसरी धक्कादायक बाजू आली समोर

संबंधीत महिलेच्या तक्रारी नुसार तिला केकमध्ये गुंगीचे औषध देवून बेशुद्ध करण्यात आलं होतं. त्यानंतर सामुहिक अत्याचार करण्यात आला.

जाहिरात
Read Time: 3 mins
ठाणे:

फॅमिली कोर्टाच्या आवारात कारमध्येच महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. ठाण्या सारख्या शहरातच हा प्रकार घडल्याने सर्वच जण हादरून गेले होते. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी हा फरार झाला होता. त्या आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे. शिवाय या प्रकरणात आता ट्वीस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे नक्की काय घडलं होतं असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोर्टात आरोपीच्या वकीलांनी केलेले दावे पाहात या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. 

संबंधीत महिलेच्या तक्रारी नुसार तिला केकमध्ये गुंगीचे औषध देवून बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. तो ही एका कारमध्ये. ही कार फॅमेली कोर्टाच्या आवारतच उभी होती.  या प्रकरणी ठाणे पोलिसांनी आरोपी हिरालाल केदार याला अटक केली होती. त्यानंतर आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं.  कोर्टाने हिरालाल केदार याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. तर फरार आरोपीला लवकरात लवकर पकडून कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. 

नक्की वाचा - Pune News: पुरंदर विमानतळासाठी जमिन! शेतकऱ्यांच्या मागणीला यश, मोठा मोबदल्यासह कोणत्या गोष्टींना सरकार तयार?

मात्र कोर्टातल्या नुसावणी दरम्यान आरोपीच्या वकीलाने मोठा दावा केला आहे. आरोपींना पैशांसाठी या प्रकरणात अडकवले जात असल्याचा दावा केला आहे. संबंधीत महिला स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली गोरख धंदा चालवत होती. तिचा हा सर्व प्रकार हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी उघडकीस आणला होता असा दावा ही कोर्टात आरोपीच्या वकिलाने केला. याचा राग या महिलेच्या मनात होता. त्यामुळेच तिने या दोघांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव रचला आहे असा आरोप त्यांनी केला. धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी संबंधीत महिलेवर बलात्कार झाला त्या दिवशी आरोपी हिरालाल केदार हा ठाण्यात म्हणजे घटनास्थळी नव्हता असा ही दावा कोर्टात करण्यात आला. आरोपीचे वकील  शुभम मोरे यांनी हा युक्तीवाद केला आहे. 

नक्की वाचा -  School Holiday: डिसेंबर महिन्यात सलग 6 दिवस शाळांना सुट्टी, 'या' तारखांना शाळा राहाणार बंद

ऑगस्ट 2024 मध्ये ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये दोन तरुणांनी वाढदिवसाच्या बहाण्याने एका महिलेस बोलावले होते. त्यानंतर तिला केकमध्ये गुंगीचे औषध दिले. तो केक त्या महिलेने खाल्ला. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत तीला एका कारमध्ये टाकण्यात आलं. या कारमध्येच त्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असा तिचा आरोप आहे. तशी तक्रारही तिने पोलीसत दिली आहे. इतकच नव्हे तर त्या महिलेचा अश्लील व्हिडिओ देखील तयार करून त्या महिलेला वारंवार दोघांकडून ब्लॅकमेल करण्यात येत होते असा तिचा आरोप आहे.

Advertisement

नक्की वाचा - Kalyan News: शिवसेना शिंदे गट- भाजपच्या वादात आता श्रीराम अन् औरंगजेबाची एन्ट्री, थेट मारामारीची भाषा