एक धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा एक कारनामा समोर आला आहे. त्यात या माजी नगरसेवकाने आपली कार एका महिलेच्या अंगावर घातली. हा माजी नगरसेवकर मद्यंधुंद अवस्थेत होता असा आरोप संबधित महिलेने केला आहे. हा सर्व प्रकार होत असताना तिथे लोकांची गर्दी झाली. लोकांनी या माजी नगरसेवकाला कानशिलातही लगावल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पोलिस आले. या प्रकरणी तक्रारही दाखल झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना राबोडी परिसरात घडली आहे. महेश सुरेश वाघ असं त्याचं नाव आहे. ते माजी नगरसेवक आहे. शिवाय ते शिवसेना शिंदे गटात कार्यरत आहेत. त्यांनी मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना महिलेच्या कारला धडक दिली. त्यानंतर त्यांनी या अपघातानंतर तिच्या अंगावरही गाडी घालण्याचा प्रयत्न केला असं ही या महिलेने सांगितले आहे. हा गोंधळ सुरू असताना उपस्थितांनी त्याचा व्हिडीओ ही काढला.
एका तरुणाने महेश वाघ यांना गाडी बाहेर खेचले. तिथे त्यांची बाचाबाचीही झाली. एकाने तर महेश यांच्या कानशिलातही लगावली. त्यावेळी ते समोरच्या लोकांचे फोटो ही काढत होते. ही घटना ठाण्यातील राबोडी परिसरात घडली. या प्रकरणी संबंधित महिलेनं राबोडी पोलीस स्थानकात माजी नगरसेवक वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)