Shocking news: खड्ड्याने 6 वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेतला!, खेळता खेळता घात झाला, जबाबदार कोण?

उशीरा पर्यंत कशफ घरी आली नाही म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. अजूबाजूचा परिसर आणि नातेवाईकांकडे ही चौकशी करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins
ठाणे:

रिझवान शेख 

दिवा येथील शिळफाटा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मित्र-मैत्रिणींना सोबत घराबाहेर खेळायला गेलेल्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पण याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दिवा येथील शिळफाटा परिसरातील आशना हाईट्स येथे  कशफ नबीला खान ही रहात होती. तिचं वय अवघ सहा वर्षाचं होतं. शुक्रवारी संध्याकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण ही घटना शनिवारी समोर आली. संध्याकाळी ही चिमुरटी आपल्या मित्रांसोबत घराशेजारील परिसरात खेळत होती. खेळता-खेळता ती परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम स्थळाजवळ गेली. त्या ठिकाणी एक खड्डा होता. शिवाय त्यात पाणी ही भरले होते. त्यात ती खेळता खेळता पडली. पण ते कोणाच्याच लक्षा आले नाही. 

Advertisement

नक्की वाचा - Uddhav Thackeray: उद्धव ठाकरें निवडणुकीच्या मैदानात? विधान परिषदेवर जाण्यासाठी कसोटी लागणार

उशीरा पर्यंत कशफ घरी आली नाही म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. अजूबाजूचा परिसर आणि नातेवाईकांकडे ही चौकशी करण्यात आली. पण तिचा काही एक पत्ता लागला नाही. शेवटी तिच्या कुटंबीयांनी डायघर पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी हे घटना स्थळी पोहोचले. त्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. त्याच वेळी तिथे असलेल्या डबक्यात ही शोध घेण्यात आला. त्यावेळी कशफचा मृतदेह त्या डबक्यात दिसू आला. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले.       

नक्की वाचा - Kalyan News : जेलमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांसह त्यांच्या मुलांना मोठा धक्का

पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह ताब्यात घेण्यात आला. शिवाय पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी डायघर पोलीस पुढील तपास करत आहेत. बांधकाम स्थळावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कशफच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.