अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan Political News Today : भाजप पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला प्रकरणात जेलमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दोन माजी नगरसेवकांसह त्यांच्या मुलांनाही मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह त्यांच्या दोन मुलांचा कल्याण न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. डोंबिवली रामनगर पोलिसांचा लावलेल्या कलमात बदल का केला,असा सवाल उपस्थित करत न्यायालयाने दोघांसह त्यांच्या दोन मुलांचा जामीन नाकारला आहे.त्यामुळे या चौघांना जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटपाच्या वादातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपआपसात भिडले होते. यात भाजप कार्यकर्ते ओमनाथ नाटेकर हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवेसना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील यांच्यासह त्यांच्या दोन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
नक्की वाचा >> Zp Election 2026: मतदानादिवशी खळबळ, या मतदान केंद्रात EVM मशीनखाली 'जादूटोणा', टाचण्या, लिंबू, मिरची अन्..
डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी केली अटक
त्या दोन नगरसेवकांची प्रकृती खालावल्याने त्याना ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल केले. न्यायालयीन कोठडी मिळालेली असताना त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. 2 फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना 3 फेब्रुवारी रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले. तेव्हा पोलीस अधिकारी राजेंद्र खेडकर यांनी 109(307) ऐवजी 118,1 (324) कलम लावून गुन्ह्याचे स्वरूप बदलले. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर ७ फेब्रुवारी सुनावणी घेण्यात आली.
नक्की वाचा >> Malegaon News : मालेगावात 'इस्लाम'ची सरशी, महापौरपदाच्या निवडणुकीचं चित्रच पालटलं, BJP आणि MIM नगरसेवकांनी..
मात्र कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश एन.पी.वासाडे यांच्यासमोर आरोपींचे वकील आशुतोष देसाई, एड प्रियंका सोनवणे आणि उमर काजी यांनी युक्तीवाद केला.त्यांची बाजू ठामपणे मांडली. आरोपी गुन्हेगार नाहीत.डोंबिवलीतील नागरिक असून ते प्रतिष्ठीत लोक आहेत.गुन्हयाचे स्वरुप दाखवल्याप्रमाणे नाही, असं म्हणत त्यांनी न्यायालयात त्यांच्या जामिनाची मागणी केली. न्यायालयाचे कामकाज संपण्याच्या शेवटच्या क्षणी न्यायाधीश वासाडे यांनी आदेश देत चारही जणांचा जामीन नाकारला आहे. कलम 109 लावण्यात आला होता. हा कलम आत्ता 118 (1) असा का केला गेला? त्याचा आधार काय ? इतकेच नाही तर मेडिकल आणि एक्सरे रिपोर्ट का दिला नाही? हे मुद्दे उपस्थित करत न्यायालयाने चौघांचा जामीन नाकारला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world