3 वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह 15 दिवसापूर्वी जंगलात पुरला, अंगावर काटा आणणारी घटना

15 दिवसापूर्वी तिचा मृतदेह पुरण्यात आला. याची कोणालाही खबर नव्हती. मात्र याबाबत कुजबूज सुरू झाली. ही बातमी सावंतवाडी पोलीसांपर्यंतही पोहोचली.

जाहिरात
Read Time: 2 mins
सिंधुदुर्ग:

एकीकडे राज्यात अत्याच्याराच्या घटना एकामागोमाग एक घटना घडत आहे. त्याचवेळी सिंधुदुर्गमध्ये सर्वांनाच हादरवून सोडणारी घटना घडली आहे. या घटनेत सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावतील सटी या डोंगर माळरानावर चिरेखाणीत 3 वर्षीय बालिकेचा मृतदेह पुरण्यात आला होता. 15 दिवसापूर्वी तिचा मृतदेह पुरण्यात आला. याची कोणालाही खबर नव्हती. मात्र याबाबत कुजबूज सुरू झाली. ही बातमी सावंतवाडी पोलीसांपर्यंतही पोहोचली. जेव्हा ते या घटनेच्या मुळापर्यंत पोहचले तेव्हा अंगावर काटा आणणारी ही दुर्घटना समोर आली. ज्या ठिकाणी पोलीस त्या चिमुकलीला पुरले होते त्या ठिकाणी पोहोचले, आणि एका धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुळ छत्तीसगडमधील एक कुटुंब रोजगारासाठी सिंधुदुर्गातील सावंतवाडीतील मळेवाड येथली चिरेखाणीत काम करत होते. ज्या मुलीचा मृतदेह पुरला गेला आहे ती याच कुटुंबातील असावी असा संशय पोलीसांना होता. त्यांनी या कुटुंबाला छत्तीसगड इथून बोलवून घेतले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाली. या तिन वर्षाच्या चिमुरडीला एका डंपरने चिरडले होते. त्याची कुठेही वाच्यता करू नये यासाठी कुटुंबावर दबाव टाकला गेला. 

ट्रेंडिंग बातमी - बंद मागे निषेध सुरू, ठाकरे, पवार, पटोले रस्त्यावर उतरणार

 त्यानंतर या कुटुंबाली जिथे त्या चिमुरडीला पुरली होती त्या ठिकाणी पोलीस घेवून गेले. तिथे त्यांच्या समोरच त्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तपासणीसाठी तो कोल्हापूर येथे पाठवण्यात आला. या प्रकरणी डंपर चालकाना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे. मळेवाड येथील जंगलमय भागात चिरेखाणीवर काम करणाऱ्या छत्तीसगड येथील परप्रांतीय कामगाराच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातात तीन वर्षाची चिमुकली जागीच गतप्राण झाली होती.

ट्रेंडिंग बातमी - आधी बदलापुरात सहानुभूती मग उल्हासनगरात जाऊन हातावर मेहंदी, चाकणकरांचं चाललंय काय?

दरम्यान या प्रकरणात कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी त्या मुलीचा मृतदेह मळेवाडच्या जंगलात पुरला गेला होता. त्यानंतर  तिच्या आई-वडिलांना गावी पाठवून देण्यात आले. हा प्रकार बाहेर आल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तो मृतदेह पुन्हा उकरून बाहेर काढला. अधिक तपास सिंधुदुर्ग पोलीस करत आहेत. शिवाय यामागे नेमका कोणाचा हात आहे? नेमका काय प्रकार आहे? या प्रकरणात अन्य कोणाचा हात आहे का? हे शोधणं आता पोलिसां समोरील मोठं आव्हान आहे.

Advertisement