जाहिरात

बंद मागे निषेध सुरू, ठाकरे, पवार, पटोले रस्त्यावर उतरणार

सर्वत्र मुक आंदोलन आणि काळ्या फिती लावून झालेल्या घटनेचा आणि सरकारचा निषेध केला जाणार आहे. यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे सहभागी होणार आहेत.

बंद मागे निषेध सुरू, ठाकरे, पवार, पटोले रस्त्यावर उतरणार
मुंबई:

बदलापूर प्रकरणात महाविकास आघाडीने बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यानंतर मविआने हा बंद मागे घेतला आहे. मात्र राज्यभर निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र मुक आंदोलन आणि काळ्या फिती लावून झालेल्या घटनेचा आणि सरकारचा निषेध केला जाणार आहे. यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे सहभागी होणार आहेत. बंद नाही तर निषेध सुरू ठेवण्याचा निर्णय यातून मविआने घेतला आहे. शिवाय राज्यातल्या सर्वचा जनतेला या मुक आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उद्धव ठाकरेहे मविआच्या निषेध मोर्च्यात सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजचा शिवसेना भवनाच्या चौकात निषेध केला जाणार आहे. यावेळी काळ्या पट्ट्या लावून निषेध करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना भवनात स्टेज उभारण्यात आले आहे. ते संपुर्ण काळ्या रंगाचे स्टेज निषेधाचे प्रतिक म्हणून उभारण्यात आले. कायदा सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्या असंवेदनशील सरकारचा निषेध असे बॅनरवर लिहीण्यात आले आहे. या वेळी मविआच्या स्थानिक नेतेही उपस्थित राहाणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार पहिल्यांदाच थेट बोलले, मविआमध्ये नवा ट्विस्ट

मुंबईत उद्धव ठाकरे मुक आंदोलनात सहभागी होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात मुक आंदोलनात सहभागी होती. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील आंबेडकर पुतळ्या जवळ हे आंदोलन होणार आहे. सकाळी अकरा वाजता हे आंदोलन होती. तोंडाला काळ्या पट्ट्या लावून हे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी शरद पवार यांच्या बरोबर खासदार सुप्रिया सुळेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - 'दोन महिन्यात फाशीची शिक्षा', मुख्यमंत्री शिंदेंच्या त्या वक्तव्यात तथ्य किती? सत्य आले समोर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ही या मुक आंदोलनात सहभागी होणार आहेत. ते स्वत: ठाण्यात मुक आंदोलनात सहभागी होतील. शिवाय राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी मुक आंदोलन काँग्रेसने करावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलनासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते रस्त्यावर उतरतील. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वात आधी शरद पवार यांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनीही ही घोषणा केली. मात्र राज्यभरात मविआकडून निषेध आंदोलन केले जाणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मविआचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, हायकोर्टाचा निर्णय

बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीने शनिवारी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. यावर आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केली . शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाने पुकारलेला बंद हा बेकायदेशीर आहे असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तरी ही कोणी बंद पुकारत असेल तर विरोधात कायदेशीर कारवाई करावी असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले होते. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या साक्षीदाराचा VIDEO आला समोर; गोळीबारानंतर नेमकं काय घडलं? पाहा
बंद मागे निषेध सुरू, ठाकरे, पवार, पटोले रस्त्यावर उतरणार
nitin-gadkari-democracy-tolerance-remark-who-is-the-target
Next Article
'राजा विरुद्ध जर कुणी प्रखर मत मांडले तर ते सहन केल पाहिजे' गडकरींचा टोमणा कोणाकडे?