जालन्यात अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे संपुर्ण गाव हैरण झाले आहे. एका व्यक्तीला कामावरून काढलं. याचा राग मनात घरून त्या वक्तीने आपलं जिवन संपवण्याचा निर्णय घेतला. तो आत्महत्या करण्यासाठी गावातल्या पिपळाच्या झाडावर चढला. त्यानंतर जवळपास तीन तास तो त्या झाडावर होता. गावाला तीन तास हे आत्महत्या नाट्य पाहायला मिळालं. या सर्व गोंधळात पोलिसांपासून ते अगदी अग्नशमन दला पर्यंत सर्वच जण गावात पोहोचले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जालन्यात आत्महत्या करण्यासाठी पिंपळाच्या झाडावर एक व्यक्त चढला होता. शिवकुमार मिरावे असं या व्यक्तीचं नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातला आहे. जालन्यात तो एका कंपनीत काम करत होता. पण तो ज्या कंपनीत काम करत होत्या त्या कंपनी मालकाने त्याला कामावरून काढून टाकले. ही बाब त्याला सहन झाली नाही. त्यानंतर त्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. काही झालं तरी आत्महत्या करायची असं त्याने ठरवलं.
त्यासाठी तो थेट शहरातील मल्टीपर्पज शाळेच्या आवारात असलेल्या पिंपळाच्या झाडावर तो चढला. आत्महत्या करण्याचं ओरडू लागला. याची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवान ही घटनास्थळी दाखल झाले. त्याला खाली उतरण्याची विनंती करण्यात आली. पण तो ऐकण्याच्या मनस्थित नव्हता. त्याला आत्महत्या करायची होती. पोलिस आणि अग्निशमन दल त्याला वाचवण्याचे प्रयत्न करत होते.
नक्की वाचा - न्यायालयातच वकील कोसळला, न्यायाधीशही धावले; नागपुरात वकिलाचा धक्कादायक शेवट!
जवळपास तीन तास हा सर्व ड्रामा सुरू होता. या सर्व गोंधळात तो झाडावरू खाली पडला. त्याच वेळी सतर्क असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली झेललं. पण त्यात तो जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. शिवाय त्याने हे पाऊल का उचललं याचाही शोध पोलीस घेत आहे.