न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला, परदेशी चलनाबरोबरच दागिने लांबवले

वरोरा शहरात राहणारे न्यायाधीश बाहेर गावी गेले होते. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला.

Advertisement
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. वरोरा शहरात राहणारे न्यायाधीश बाहेर गावी गेले होते. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला. यावेळी चोरट्यांनी सोने, चांदी रोख रक्कम असा हजारो रुपयाचा ऐवज लंपास केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून चौकशी केली शिवाय पुढील तपासही सुरू केला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जिल्हातील सीनियर डिव्हिजनचे दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी डी.आर. पठाण हे आहेत.  वरोरा शहरातील देशपांडे पेट्रोल पंपाच्या जवळील ओम शांती नगरात ते राहात होते. चंद्रकांत पुसदकर यांचे ते भाडेकरू होते. मात्र गेल्या काही दिवसापासून ते बाहेर गावी गेले होते. त्यांच्या घरावर चोरट्यांनी पाळत ठेवली होती. घरात कोणी नाही याची त्यांना खात्री झाली. त्यानंतर समोरील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

हेही वाचा - भरधाव कारची 3 वर्षांच्या बाळासह तिघांना धडक, स्थानिकांनी गाडीची तोडफोड करत मद्यधुंद तरुणाला चोपले

चोरानी घरातील बारा ग्राम सोन्याची चैन, दहा हजार रोख रक्कम, सौदी अरेबियाचे पाचशे व दोनशे रुपयांचे डॉलर ही चोरट्यांनी लंपास केले आहेत. न्यायाधीश घरी परत आल्यानंतर काही वस्तू घरात नाहीत हे त्यांच्या लक्षात आहे. त्या चोरीला गेल्याचे त्यांना जाणीव झाली. त्यांनी तातडीने वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली. वरोरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसे तज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण केले. श्वान पथक ही घटनास्थळी आले होते. घटनेचा तपास वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे करत आहे.

Advertisement