Pune Crime: सिनेस्टाईल थरार! पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; सातारच्या भाईला ठोकलं

प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

 पुणे: शिक्रापूर (ता. शिरूर) मलठण फाटा परिसरात शनिवारी सायंकाळी थरारक घटना घडली. पोलिसांच्या पथकाला अटक करायचा प्रयत्न असताना संशयित आरोपीने अचानक चाकू काढून हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत आरोपीची ओळख लखन पोपट भोसले (रा. वडगाव पुसावले, ता. सातारा) अशी झाली आहे. त्याच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे व पोलीस हवालदार सुजित भोसले हे शिक्रापूरात पथकासह दाखल झाले होते.

Konkan Crime News : गणेशोत्सवादरम्यान कोकण हादरलं! आंबा घाटात तरुणीच्या मृतदेहाने परिसरात खळबळ

सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी लखन भोसलेला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने अचानक सुजित भोसले यांच्यावर चाकूने वार केला. या धक्कादायक प्रकारामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये लखन गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.

Advertisement

नक्की वाचा - Titwala : इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली जीवघेणी; टिटवाळ्याच्या तरुणीनं व्हिडिओ कॉल करत संपवलं आयुष्य