मोसीन शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एमआयएमचे नगरसेवक मुन्शी भिकन शेख यांच्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घराजवळ घडेल्या चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मुन्शी भिकन शेख यांच्या घराजवळ उभी असलेली स्कॉर्पिओ चोरण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला.या चोरीच्या घटनेबाबत मुन्शी यांना समजताच ते घराबाहेर गेले. त्यानंतर त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी थेट मुन्शी यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला आहे.
चोरट्यांनी शेख यांच्या अंगावर गाडी घातली आणि नंतर..
याबाबत सविस्तर वृत्त असं की,नगरसेवक मुन्शी भिकन शेख हे 6 मे 2026 रोजी पहाटे त्यांच्या राहत्या घरी हॉलमध्ये बसले होते. सीसीटीव्ही स्क्रीनवर त्यांना संशयास्पद हालचाल दिसली. घरासमोर पार्क केलेली स्कॉर्पिओ उघडून एक अज्ञात व्यक्ती आत बसत असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर शेख यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. पण पळ काढण्याच्या नादात त्यांच्या अंगावर गाडी घातली.
— Naresh Shende (@NareshShen87640) May 7, 2026
नक्की वाचा >> Pune News: PMPML च्या अध्यक्षांच्या कारला भीषण अपघात,मुंबईहून पुण्याकडे निघाले अन् त्या रोडवर घडलं असं काही..
उडी मारल्याने नगरसेवकाचा जीव थोडक्यात वाचला
शेख यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला. तर याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भरवस्तीत नगरसेवकावर झालेला हा हल्ला आणि चोरीचा प्रयत्न यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता या टोळीचा शोध घेत आहेत.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण-डोंबिवली,अंबरनाथ,बदलापूरला वादळाचा तडाखा, नागरिकांमध्ये घबराट, पाहा काय काय घडलं? Video
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world