Akola Crime : पत्नीचं मंगळसूत्र वाचविण्यासाठी जीवाची बाजी; चेहरा विद्रुप केला, पतीची भयंकर अवस्था!

अकोल्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला चोरट्यांनी बेदम मारहाण केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

अकोल्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला चोरट्यांनी बेदम मारहाण केली. इतकच नाही तर चोरांनी पतीचा चेहरा दगडाने ठेचून काढला. अकोल्यातल्या रेल्वे स्थानकाजवळ हा सर्व प्रकार घडला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर एक महिला उभी होती. त्यावेळी काही जण तेथे आले आणि त्यांनी महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र खेचलं आणि पळ काढला. त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. पत्नीचं मंगळसूत्र मिळविण्यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करीत होते.  याच दरम्यान चोरट्यांनी गावंडे यांना बेदम मारहाण केली.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Beed Crime : 'ही माणसं आहेत की जनावरं?' बीडमध्ये 25 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, 2 दिवस डांबून जबर मारहाण

Advertisement

इतकच नव्हे तर त्यांचा चेहरा देखील दगडाने ठेचून काढला. काल रात्री उशिरा अकोला रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. सद्यस्थित हेमंत गावंडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर भेट देत पाहणी केली. तसेच मंगळसूत्र चोरट्याच्या शोधासाठी  पथक गठीत केलं असून त्यांना चोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याचवेळी रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेल्वे स्थानक परिसरात एवढी मोठी घटना घडते, त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होत आहे.

Topics mentioned in this article