Chhatrapati Sambhajinagar: पैसे नाही तर ATM चं चोरले, चोरट्यांची शक्कल पाहून पोलिसही चक्रावले

पोलिस आता या चोरट्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांना पकडले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI image
छत्रपती संभाजीनगर:

चोरी करण्यासाठी चोर काय करतील हे सांगता येत नाही. त्यासाठी ते कितीही टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत असतात. ते चोरीसाठी लढवत असलेली शक्कल ही भन्नाट असते. त्यामुळे काही वेळा पोलिसही चक्रावून जातात. अशीच एक चोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही चोरी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. चोर चोरी करुन फरार झाली आहे. पण त्यांच्या चोरीच्या पद्धतीमुळे सर्वच जण आवाक झाले आहेत. 

छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएमवर चोरट्यांचा डोळा होता. एटीएम फोडायचे आणि त्यातील असतील तेवढे पैसे घेवून पळून जायचे असा त्यांचा प्लॅन होता. पण ज्या वेळी ते पैसे चोरण्यासाठी एटीएममध्ये गेले त्यावेळी त्यांचा मन बदललं. त्यांनी एटीएम फोडण्या पेक्षा एटीएम मशिनच चोरी करून नेलं तर काय होईल असा विचार केला. शेवटी त्यांना हा विचार प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला. 

नक्की वाचा - Pune News: आयुष कोमकरच्या हत्ये आधी काय घडलं? थरारक घटनाक्रम सांगताना आई ढसाढसा रडली

त्यानुसार त्यांनी चक्क एटीएम मशिनच घेवून चोरटे पसार झाले. या एटीएम मशीनमध्ये तब्बल 16 लाख 7 हजार 100 रुपयांची रक्कम होती. या रक्कमेवरच चोरांना डल्ला मारला आहे. ही घटना उघडकीस येतात वेरूळ परीसरात मोठी खळबळ उडाली आहे. रोकडसह एटीएम मशीन चोरी करणारे चोरटे हे पसार झाले आहेत. त्यांचा अजूनही काही पत्ता लागलेला नाही. त्यामुळे  या चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान छत्रपती संभाजीनगर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

नक्की वाचा - 4 महिन्या पूर्वी लग्न, सासरचा जाच, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी टोकाचं पाऊल, लेकीसाठी आई-बापाचा हंबरडा

या घटनेमुळे एटीएम मशिनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक एटीएम सेंटर बाहेर सुरक्षा रक्षक तैनात असतात. शिवाय सीसीटीव्हीचे कव्हरही त्यांना असते. या सर्व गोष्टी असतानाही चोरटे त्याची पर्वा करत नाहीत. अशा स्थिती एटीएमची सुरक्षा करायची कशी असा प्रश्न बँकां समोर आहे. दरम्यान पोलिस आता या चोरट्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांना पकडले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

Advertisement