जाहिरात

4 महिन्या पूर्वी लग्न, सासरचा जाच, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी टोकाचं पाऊल, लेकीसाठी आई-बापाचा हंबरडा

आई वडीलांसह भावाने जिल्हा रुग्णालय परिसरात आक्रोश करत टाहो फोडला.

4 महिन्या पूर्वी लग्न, सासरचा जाच, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी टोकाचं पाऊल, लेकीसाठी आई-बापाचा हंबरडा
जळगाव:

मंगेश जोशी 

Jalgaon News: महिलांवरिल अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाही. अशीच एक घटना आता जळगावमध्ये घडल्याचे समोर आले आहे. 
जळगाव शहरातील सुंदर मोती नगर परिसरात सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे.  लग्नाच्या अवघ्या चार महिन्यात तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे  वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीचं तिने आपलं जीवन संपवलं.मयुरी गौरव ठोसर असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. लेकीनं आत्महत्ये केल्याचं समजताच तिच्या आई वडीलांसह भावाने जिल्हा रुग्णालय परिसरात आक्रोश करत टाहो फोडला. त्यावेळी सर्व जण सुन्न झाले होते.  

सासरच्या लोकांकडून मयुरीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तसेच पैशांची देखील मागणी केली जात होती, असा आरोप मयुरीच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणी सासरच्यांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी विवाहितेच्या आई-वडिलांनी केली आहे. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत विवाहितेचे शवविच्छेदन करण्यास माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. पोलिसांना तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता मयुरीच्या कुटुंबियांनी केली आहे.  

नक्की वाचा - Pune News: आयुष कोमकरच्या हत्ये आधी काय घडलं? थरारक घटनाक्रम सांगताना आई ढसाढसा रडली

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. तिच्या लग्नाला अवघे चार महिनेच झाले होते. नुकताच तिचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सासरचे लोक तिला मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. याची तक्रार मयुरीने आपल्या कुटुंबीयांनाही केली होती. शिवाय सातत्याने पैशांची मागणी करण्यात येत होती. यातून तिचा छळ होत असल्याचा आरोप मयुरीचा कुटुंबियांनी केला आहे. 

नक्की वाचा - Pune Gangwar Inside story: आयुष कोमकरची हत्या टाळता आली असती, टीप मिळूनही पोलिसांचं काय चुकलं?

सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची अनेक प्रकरणे अलिकडच्या काळात घडली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर तर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. तिच्या सासू सासऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. असं असलं तरी असा घटना थांबायचे नाव घेत नाहीत. त्या होतच असल्याचं आता मयुरीच्या आत्महत्येने पुन्हा एकदा समोर आलं आहे. अशा स्थितीत मयुरीला न्याय मिळाला पाहीजे अशी मागणी जळगावमधून होत आहे. या घटनेनंतर तिचे सासरचे लोक पोलिसांना भेटले नाहीत.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com