संजय तिवारी, नागपूर
महिलेचा मोबाईल नंबर मिळवण्यासाठी पैज लावणे तीन जणांना चांगलंच महागात पडलं आहे. महिलेचा पाठलाग करणे, असभ्य वर्तन अशी छपरीगिरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागपूरमध्ये ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला एका हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी गेल्या होत्या. त्याच हॉटेलमध्ये महिलांच्या शेजारीच तिन्ही आरोपी आधीपासूनच बसले होते. या टेबलच्या बाजूला बसून तिन्ही आरोपी महिलांकडे पाहून आरोपी गैरवर्तन आणि शेरेबाजी करत होते. काही वेळाने महिला हॉटेलमधून बाहेर पडल्या. त्यानंतरही तिन्ही आरोपींची महिलांना त्रास देणे सुरुच होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महिला घरी निघाल्या असताना त्यातील एका महिलेचा फोन नंबर कोण घेणार यावरुन तिघांची एकमेकांमध्ये पैज लागली. या महिलेचा नंबर जो मिळवेल त्याला 50 हजार देऊ, अशी पैज त्यांनी एकमेकांमध्ये लावली. महिलेचा फोन नंबर घेण्यासाठी आरोपींनी तिला थेट विचारणा देखील केली.
(नक्की वाचा- किराणा दुकानात सुरू होती भलत्याचा मालाची विक्री, धाडीनंतर पोलीसही चक्रावले)
मोबाईल नंबर मिळवण्यासाठी आरोपींनी महिलेच्या घरापर्यंत पाठलाग देखील केला. हा सगळा प्रकार घडल्यानंतर महिलेने याबाबत पोलिसात तक्रार केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधून त्याआधारे आरोपींना अटक केली.
( नक्की वाचा : 'पतीचे पत्नीबरोबर अनैसर्गिक संबध बलात्कार नाही' उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी अमरावती येथून कामानिमित्त नागपूर येथे आले होते. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर चौकशी केली असता त्यांनी फोन नंबर मिळवण्यासाठी 50 हजार रुपयांची पैज लावली होती आणि त्यासाठी महिलेचा पाठलाग केल्याचे मान्य केलं.