जाहिरात

Thane News: टिटवाळ्यातील वयोवृद्ध दाम्पत्याचा मृतदेह मुरबाडमध्ये सापडला, पोटच्या मुलीनं केलं असं काही..

मागील सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वयोवृद्ध दाम्पत्याचा मृतदेह मुरबाड तालुक्यातील एका निर्जन ठिकाणी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Thane News: टिटवाळ्यातील वयोवृद्ध दाम्पत्याचा मृतदेह मुरबाडमध्ये सापडला, पोटच्या मुलीनं केलं असं काही..
Titwala Couple Death Crime News

Thane Crime News Today:  मागील सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वयोवृद्ध दाम्पत्याचा मृतदेह मुरबाड तालुक्यातील एका निर्जन ठिकाणी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. टिटवाळ्यात राहणारे महादू घरत (85) आणि त्यांची पत्नी कमलाबाई घरत (75) अशी मृतांची नावे आहेत. मुलीकडून पैशांसाठी आई-वडिलांना मानसिक छळ केला जात असल्याने त्यांनी आत्महत्या केली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,23 तारखेपासून हे दाम्पत्य घरातून बेपत्ता होते.याबाबत त्यांच्या मुलीने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यानंतर पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू होता.शोधमोहीम सुरू असतानाच मुरबाड परिसरातील एका निर्जन ठिकाणी या दोघांचे मृतदेह आढळून आले.ही माहिती मिळताच मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

मुलीकडून वारंवार पैशांची आणि संपत्तीची मागणी

प्राथमिक तपासात समोर आलं की, मृत दाम्पत्य त्यांच्या मुलीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळले होते. मुलीकडून वारंवार पैशांची आणि संपत्तीची मागणी केली जात असल्याने ते मानसिक तणावाखाली होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली,असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी म्हटलंय की, तक्रारीनंतर दोघांचा शोध सुरू होता.

नक्की वाचा >> Pune News: पवना धरणातील पुरातन वाघेश्वर मंदिर 8 महिन्यांनी पाण्याबाहेर, महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

मात्र आता त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास मुरबाड पोलीस करत आहेत.दरम्यान,ही आत्महत्या आहे की घातपात? याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून वयोवृद्धांनी वाढत्या छळाच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com