लग्नाला झाले होते फक्त 2 महिने ! पत्नी प्रियकरासोबत पळाली,पती आणि मध्यस्थानं संपवलं आयुष्य

Davanagere Double Suicide: विश्वासघात, दोन मृत्यू आणि एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा झालेला अंत... केवळ दोन महिन्यांच्या संसाराला असं भीषण वळण लागेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं.

जाहिरात
Read Time: 3 mins
Woman Elopes With Lover : हरिश आणि सरस्वती यांचं दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं.
मुंबई:

Woman Elopes With Lover : विश्वासघात, दोन मृत्यू आणि एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा झालेला अंत... केवळ दोन महिन्यांच्या संसाराला असं भीषण वळण लागेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. लग्नाचं पवित्र बंधन एका बाजूला आणि जुनं प्रेम दुसऱ्या बाजूला, या संघर्षात अखेर माणुसकी हरली आणि दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. ही घटना वाचताना मन सुन्न होतं, कारण यात दोष नेमका कोणाचा, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

संसाराची स्वप्ने आणि अनपेक्षित वळण

हरिश आणि सरस्वती यांचा विवाह अवघ्या 2 महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात पार पडला होता. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच 23 जानेवारी रोजी सरस्वती मंदिरात जाते असं सांगून घरून निघाली. ती परत येईल या आशेवर कुटुंब होतं, पण काळ काही वेगळंच घेऊन आला होता. बराच वेळ उलटूनही ती न परतल्याने शोधाशोध सुरू झाली आणि पोलिसांत तक्रार करण्यात आली. तपासात जे समोर आलं ते धक्कादायक होतं. 

सरस्वती तिच्या जुन्या प्रियकरासोबत, शिवकुमारसोबत पळून गेली होती. लग्नापूर्वीच्या तिच्या प्रेमसंबंधांची कल्पना पती हरिशला होती, पण लग्नानंतर ती सर्व विसरून सुखाचा संसार करेल, अशी त्याची खात्री होती.

( नक्की वाचा : Nashik News: आई-बाबा मला माफ करा! हातावर शेवटचा संदेश लिहून नाशिकमध्ये 21 वर्षांच्या तरुणीनं संपवलं आयुष्य )
 

मानसिक धक्का आणि पतीचा अंत

आपल्या पत्नीने विश्वासघात केल्याचे समजताच 30 वर्षीय हरिश पूर्णपणे कोसळला. समाजात झालेली बदनामी आणि मनात साचलेलं दुःख त्याला सहन झालं नाही. त्याने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली, ज्यामध्ये त्याने या परिस्थितीला जबाबदार असलेल्यांची नावे स्पष्टपणे लिहिली. हरिशच्या जाण्याने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झालं नाही, तर या घटनेचे पडसाद आणखी भीषण उमटले.

Advertisement

मध्यस्थाची भीती आणि दुसरं मरण

हरिशच्या मृत्यूची बातमी समजताच या लग्नाचे मध्यस्थ असलेले 36 वर्षीय रुद्रेश हादरून गेले. रुद्रेश हे सरस्वतीचे सख्खे मामा होते आणि त्यांनीच विश्वासाने हे लग्न लावून दिलं होतं. आपल्या भाचीच्या एका चुकीच्या पावलामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्याची बोचणी त्यांना लागली. 

या मानसिक तणावातून आणि अपराधीपणाच्या भावनेतून त्यांनीही आपली जीवनयात्रा संपवली. एका पळून जाण्याच्या घटनेने दोन दिवसात दोन घरे उघड्यावर पाडली.

( नक्की वाचा : Sadhvi Death Mystery: इंजेक्शन,Insta पोस्ट आणि Viral Video, साध्वीच्या धक्कादायक मृत्यूनं लाखो अनुयायींना शॉक! )

नेमकं कुठे घडलं हे थरारनाट्य?

ही हृदयद्रावक घटना कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात घडली आहे. सध्या संपूर्ण परिसरात केवळ याच घटनेची चर्चा सुरू आहे. दावणगेरेच्या एसपी उमा प्रशांत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

या प्रकरणात पोलिसांनी सरस्वतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिच्यावर SC/ST (Prevention of Atrocities) Act अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रियकर शिवकुमारची या प्रकरणात नेमकी काय भूमिका होती, त्याने सरस्वतीला पळून जाण्यासाठी कसं चिथावलं, याचा तपास पोलीस करत आहेत. दोन्ही बाजूंच्या तक्रारींनंतर पोलिसांनी डिजिटल पुरावे आणि सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. एका लग्नाचा असा करुण शेवट होईल, याची कल्पना कोणालाही नव्हती.
 

Advertisement

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)