Nashik News: नाशिकमध्ये एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका 21 वर्षीय दिव्यांग तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. दीक्षा त्रिभुवन असे या मृत तरुणीचे नाव असून तिने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या हातावर पालकांसाठी एक शेवटचा संदेश लिहिला होता. जन्मजात दिव्यांग असलेल्या दीक्षाने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दीक्षा स्वभावाने अत्यंत शांत आणि मिळनसार होती, त्यामुळे तिच्या अशा जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना रविवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. नाशिक शहरातील एका दिव्यांग विद्यालयात शिकणारी दीक्षा घरी असताना तिने पंख्याला लटकून गळफास घेतला. घरातील सदस्यांनी जेव्हा तिला या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.
कुटुंबीयांनी तातडीने तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यावर नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. आपल्या भविष्याची आशा असलेली मुलगी अशा प्रकारे साथ सोडून जाईल, याची पुसटशी कल्पनाही तिच्या आई-वडिलांना नव्हती.
( नक्की वाचा : Elevator Accident: बाप रे! वरून लिफ्ट धावत होती, खाली मृतदेह चिरडला जात होता; 10 दिवसांनंतर उलगडलं भयानक सत्य )
शवविच्छेदनादरम्यान दीक्षाच्या हातावर एक भावनिक संदेश लिहिल्याचे पोलिसांना आढळून आले. तिने आपल्या हाताच्या तळव्यावर सॉरी, आय लव यू मॉम-डॅड असे लिहिले होते. आपल्या मृत्यूला सामोरे जाताना तिने आई-वडिलांची माफी मागितल्याने पोलीसही हेलावून गेले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गंगापुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक आता या आत्महत्येमागचे नेमके कारण शोधत आहे.
दीक्षाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. ती दिव्यांग असली तरी तिचा स्वभाव आनंदी असल्याने आत्महत्येचे गूढ अधिकच वाढले आहे. पोलीस आता तिच्या मित्रमैत्रिणींकडे आणि शाळेत चौकशी करून आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एका तरुण मुलीच्या जाण्याने त्रिभुवन कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world