Tragic Death : बापाचा शेवटचा संघर्ष! रक्ताच्या थारोळ्यातून मुलीला केला कॉल, दुर्दैवी अंत वाचून डोळे पाणावतील

मकर संक्रांतीच्या आनंदाला गालबोट लावणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सण साजरा करण्याच्या उत्साहात वापरल्या जाणाऱ्या एका जीवघेण्या वस्तूने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Tragic Death : 48 वर्षांच्या बापानं रस्त्यावर तडफडत जीव दिला.
मुंबई:

मकर संक्रांतीच्या आनंदाला गालबोट लावणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सण साजरा करण्याच्या उत्साहात वापरल्या जाणाऱ्या एका जीवघेण्या वस्तूने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका व्यक्तीनं मरताना त्याच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी किंवा तिच्याशी शेवटचे बोलण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते.

 कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील एका पुलावर पतंगाच्या धारदार मांजाने एका दुचाकीस्वाराचा गळा चिरला आणि काही क्षणातच सर्व संपले.

बापाचा अखेरचा संघर्ष

संजूकुमार होसमानी असे या 48 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. ते बीदर जिल्ह्यातील तालमडगी पुलाजवळून आपल्या दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली. रस्त्यावर आडव्या आलेल्या मांजाचा संजूकुमार यांना अंदाज आला नाही आणि तो थेट त्यांच्या गळ्याला अडकला. 

मांजा इतका ताणलेला आणि धारदार होता की त्यामुळे त्यांच्या गळ्यावर खोलवर जखम झाली. दुचाकीवरून खाली पडल्यानंतर प्रचंड रक्तस्त्राव होत असतानाही त्यांनी मोबाईल काढून त्यांच्या मुलीला फोन लावण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांचा हा शेवटचा संघर्ष पाहून कोणाचेही डोळे ओलावतील.

( नक्की वाचा : Kolhapur News : मुख्याध्यापकाची नियत फिरली, शाळेतील मुलीला घरी बोलावलं आणि... कोल्हापूर हादरलं! )

मदतीसाठी धावले पण...

रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाटसरूने संजूकुमार यांना या अवस्थेत पाहिले आणि मदतीसाठी धाव घेतली. त्याने आपल्याजवळील कपड्याने संजूकुमार यांच्या गळ्यातील जखम दाबून धरली जेणेकरून रक्तस्त्राव थांबावा. 

Advertisement

स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले, परंतु रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. संजूकुमार यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला. रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर त्यांचे प्राण वाचले असते, असा संताप आता व्यक्त केला जात आहे.

(नक्की वाचा : अल्पवयीन मुलीला Grooming Gang चा विळखा, घरात कोंडलं, पण 200 जणांनी एकत्र येत केली थरारक सुटका, पाहा VIDEO )

नायलॉन मांजाची जीवघेणी हौस

मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवण्यासाठी पूर्वी सुती दोऱ्याचा वापर व्हायचा, मात्र आता त्याची जागा नायलॉन किंवा चायनीज मांजाने घेतली आहे. हा मांजा स्वस्त आणि कधीही न तुटणारा असल्याने लोक तो आवडीने वापरतात, पण तोच आता मृत्यूचा सापळा बनत आहे.

Advertisement

दुचाकीस्वारांना वेगात असताना हा बारीक दोरा दिसत नाही आणि तो थेट गळ्याला घासल्या जातो. मन्ना एखेल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

केवळ कर्नाटकच नव्हे, तर देशाच्या इतर भागातही नायलॉन मांजानं जीव जाण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. नुकतेच मध्य प्रदेशातील इंदूर येथे 45 वर्षीय रघुवीर धाकड यांचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला. तर दिल्लीमध्ये जुलै 2025 मध्ये एका 22 वर्षीय उद्योजकाला अशाच प्रकारे जीव गमवावा लागला होता. प्रशासनाकडून बंदी असूनही छुप्या पद्धतीने विकला जाणारा हा जीवघेणा मांजा रोखण्याचे मोठे आव्हान आता समोर उभे ठाकले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article