Sadhu murdered in Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधुची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात साधुवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराच्या मारहाणीनंतर 52 वर्षीय साधुचा जागीच मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने आखाड्याचे महंत आक्रमक झाले आहेत. आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही पुरावे सादर केले. नशेखोरांच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यातील महंतांचा आरोप आहे. या घटनेनंतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीतील दारु दुकाने बंद करण्याची मागणी साधू महंतांकडून केली जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.