टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता गजाआड! बाथरूममध्ये जबरदस्तीने संबंध ठेवल्याचा आरोप

TV Actor Ashish Kapoor Arrested : टीव्ही अभिनेता आशिष कपूरला दिल्ली पोलिसांनी पुण्याहून अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
TV Actor Ashish Kapoor Arrested : पीडितेचा आरोप आहे की, पार्टीदरम्यान वॉशरूममध्ये अभिनेत्याने तिच्यावर जबरदस्ती केली.
मुंबई:

TV Actor Ashish Kapoor Arrested : टीव्ही अभिनेता आशिष कपूरला दिल्ली पोलिसांनी पुण्याहून अटक केली आहे. त्याच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना कथितरित्या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागात एका हाऊस पार्टीदरम्यान घडली. पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितले की, तिची आणि आशिष कपूरची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. ती एक इव्हेंट मॅनेजर असून, ही पार्टी एका खासगी घरात आयोजित करण्यात आली होती. पीडितेचा आरोप आहे की, पार्टीदरम्यान वॉशरूममध्ये अभिनेत्याने तिच्यावर जबरदस्ती केली.

सुरुवातीच्या एफआयआरमध्ये आशिष कपूरव्यतिरिक्त त्याचे मित्र, मित्राची पत्नी आणि दोन अज्ञात व्यक्तींची नावे होती. मात्र, नंतर पीडितेने आपला जबाब बदलून सांगितले की, बलात्कार फक्त आशिष कपूरने केला होता.

( नक्की वाचा : गायक राहुल देशपांडेनंतर ‘या' अभिनेत्रीचा घटस्फोट; लग्नाच्या अवघ्या 5 वर्षांत संपला संसार )

पीडितेने असाही दावा केला आहे की, या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले गेले होते, पण पोलिसांना अद्याप असा कोणताही व्हिडिओ सापडलेला नाही. पोलिसांनुसार, घटनेनंतर पीडितेला मारहाणही करण्यात आली होती आणि पीसीआर कॉल आरोपीच्या मित्राच्या पत्नीने केला होता. हे प्रकरण सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे आणि पोलिसांचा तपास सुरू आहे.

Topics mentioned in this article