
Shubhangi Sadavarte Anand Oak divorce announcement : प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी मंगळवारी ( 2 सप्टेंबर ) रोजी घटस्फोटाची घोषणा केली होती. राहुल आणि त्यांची पत्नी नेहा 17 वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले. त्यांच्या घोषणेमुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच आणखी एका सेलिब्रेटी कपलनं घटस्फोटाची घोषणा केली आहे.
‘संगीत देवबाभळी' या गाजलेल्या नाटकामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि तिचा संगीतकार पती आनंद ओक यांचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या फक्त 5 वर्षांनंतरच हे दोघे वेगळे झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आनंद ओक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
शुभांगी सदावर्ते आणि आनंद ओक यांचा 2020 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो त्यावेळी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. मात्र, आता हे दोघे विभक्त झाले आहेत. आनंद ओक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून ही बातमी दिली. ‘आम्ही दोघे काही वर्षांपूर्वीच वेगळे झालो होतो, पण आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आली आहे,' असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
'शुभांगी एक उत्कृष्ट अभिनेत्री'
आनंद ओक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शुभांगीबद्दल आदर व्यक्त केला आहे. 'आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. शुभांगी एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि चांगली व्यक्ती आहे,' असे त्यांनी लिहिले आहे. शुभांगीला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना ते पुढे म्हणाले, 'भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही दोघेही पूर्वीसारखेच एकत्र काम करू.'
( नक्की वाचा : Rahul Deshpande : धक्कादायक! गायक राहुल देशपांडे यांचा 17 वर्षांनी घटस्फोट, भावुक घोषणा करताना म्हणाले... )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world