'ती ड्युअल पर्सनालिटी...'; चौथी व्यक्ती डोक्यात; ट्विशा प्रकरणात निवृत्त जज सासू गिरीबाला सिंह यांचा मोठा आरोप

Twisha Sharma Case Giribala Singh Exclusive: नोएडाची रहिवासी असलेल्या ट्विशा शर्माच्या १२ मे २०२६ रोजी झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर ८ दिवस उलटून गेले तरी तिच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Twisha Sharma: "A Fourth Person Was in Her Mind," Claims Mother-in-Law Giribala Singh.

भोपाळ : नोएडाची रहिवासी असलेल्या ट्विशा शर्माच्या १२ मे २०२६ रोजी झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर ८ दिवस उलटून गेले तरी तिच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत. या प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. ट्विशाचे वडील नवनीधी शर्मा आणि तिची सासू व निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह हे ट्विशाचा मृत्यू आणि तिच्या जीवनशैलीबाबतमोठे दावे करत आहेत. NDTV शी EXCLUSIVE बातचीत करताना गिरिबाला सिंह यांनी ट्विशा आणि तिच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

गिरिबाला सिंह यांनी दावा केला की, आम्ही तिला ७ ते ८ लाख रुपये दिले होते, पण गेल्या ५ महिन्यांत एवढे पैसे कुठे खर्च झाले? तिच्या बॅगेत एक गाडी आणि एका घराची चावी सापडली आहे. ती गाडी कोणाची आहे आणि कुठे आहे, हे कोणालाच माहित नाही. दुसरी चावी कदाचित नोएडातील घराची असू शकते. त्यांनी पुढे सांगितले की, ट्विशा 'ड्युअल पर्सनालिटी'ची होती आणि घटनेच्या रात्री तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं.

Advertisement

'ट्विशा ड्युअल पर्सनालिटीची होती'

गिरिबाला सिंह यांनी आरोप केला की, ट्विशा ड्युअल पर्सनालिटीची होती. १२ मे रोजी घटनेच्या रात्री आमच्याशिवाय तिच्या डोक्यात कोणीतरी 'चौथा व्यक्ती' देखील होता. ती टीव्ही पाहत होती आणि अचानक हे सर्व घडले. तिचे वर्तन असे होते की ती एका क्षणात आनंदी व्हायची तर दुसऱ्याच क्षणात नाराज व्हायची. आम्ही हे लग्न आणि कुटुंब वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, तरीही तिने असे पाऊल उचलले, तर आम्ही काय करणार?"

'कधीकधी तिचे मूल जन्माला घालण्याचे मन असायचे'

गिरिबाला सिंह यांनी मोठा दावा करताना सांगितले की, "कधीकधी ट्विशाचे मूल जन्माला घालण्याचे मन असायचे, पण नंतर ती म्हणायची की, मी खाऊन-खाऊन जाड होईल. लग्नानंतर ट्विशा एक चांगली सून बनण्याचा प्रयत्न करत होती. एप्रिल महिन्यात तिने आम्हाला सांगितलं की, तुम्ही जसा विचार करत आहात मी तशी नाहीये. मी तुम्हा लोकांची फसवणूक केली आहे. काहीतरी चुकीचे काम केले आहे. तोपर्यंत ती गरोदर राहिली होती. त्यावर आम्ही तिला म्हणालो की काळजी करू नकोस आणि सर्व काही स्पष्ट सांग.

Twisha Sharma: Retd Judge Giribala Singh Questions Twisha ₹8 Lakh Expense & Mysterious Car Key.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नोएडाची रहिवासी असलेल्या ट्विशा शर्माचे लग्न डिसेंबर २०२५ मध्ये भोपाळच्या समर्थ सिंहसोबत झालं होतं. एका मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. समर्थ हा निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांचा मुलगा असून तो स्वतः वकील आहे. १२ मे २०२६ रोजी भोपाळच्या कटारा हिल्स येथील घरात ट्विशाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ट्विशाच्या माहेरच्या लोकांचा आरोप आहे की, लग्नाच्या काही काळापासूनच हुंड्यासाठी तिचा छळ केला जात होता.

शवविच्छेदन अहवालात ट्विशाचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे समोर आलं असलं, तरी तिच्या शरीरावर जखमा आणि मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. मृत्यूनंतर तिचा मृतदेह भोपाळच्या एम्स रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. तिचे वडील नवनीधी शर्मा आपल्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहेत आणि न्यायाची मागणी करत आहेत.

Advertisement