चेंडू काढण्यासाठी तलावात उतरले, अंदाज चुकला अन् जिवलग मित्रांनी जीव गमावला

जाहिरात
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोघे जिवलग मित्र क्रिकेट खेळत होते. मात्र क्रिकेट खेळणं हे त्यांच्या जिवावर बेतेल याची पुसटतीही कल्पना त्यांना नव्हती. शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे मुलं खेळण्या बागडण्यात वेळ घालवत आहे. गौरव विलास ठाकूर वय 14 वर्ष आणि शौर्य भास्कर पिंपशेडे वय पंधरा वर्षे हे दोघेही त्यापैकीच. आपल्या मित्रांसह दोघेही क्रिकेट खेळत होते. खेळता खेळता त्यांचा चेंडू बाजूलाच असलेल्या तालावात गेला. तो चेंडू काढण्यासाठी हे दोघेही तलावात उतरले आणि नको तेच झाले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

क्रिकेट खेळत असताना चेंडू तलावात पडल्याने चेंडू आणण्यासाठी दोघं मित्र तलावात उतरलेत. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात घडली आहे. गौरव विलास ठाकूर ( 14 ), शौर्य  भास्कर पिंपशेडे ( 15 ) अशी मृतकांची नावे आहेत. 

हेही वाचा - Mother's Day 2024: पहिल्यांदाच आई होताय? महिलांनो अशी घ्या शारीरिक-मानसिक आरोग्याची काळजी

या घटनेने गोंडपिपरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. सोबतचा मित्रांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी  तलावाकडे धाव घेतली. तलावाचा काठावर दोघांचे कपडे आढळून आलेत. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळ पोहचले. उशिरापर्यंत शोध मोहीम राबविला गेली. मात्र अंधार झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. मात्र पहाटेपासूनच मुलांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. त्यावेळी या दोघांना शोधण्यात पोलिसांना यश आले. दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

Advertisement