अमजद खान
बालसुधार गृहातून 6 अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या शासकीय बाल सुधारगृहातून या मुली पळाल्या. सहा पैकी दोन मुलींचा शोध पोलिसांनी घेतला आहे. तर चार मुलींचा शोध पोलिस घेत आहेत. सापडलेल्या मुलींनी पोलिासांना जबाब दिला आहे की, आम्हाला त्या ठिकाणी राहायचे नाही. त्यामुळे आम्ही पळून गेलो. या मुली पळून गेल्याने बालसुधारगृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान उल्हासनगर येथील शासकीय बालसुधार गृहातून सहा अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या. त्यानंतर माहिती समोर आली की, या मुलींनी मेन गेटची चावी कुठून तरी मिळवली. मेन गेट उघडून सहा मुलींनी तिथून पलायन केले. या प्रकरणात उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सहा मुली अचानक बेपत्ता झाल्याने याचा तपास सुरु केला.
उल्हासनगरचे डीपीसी सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींना शोधण्यासाठी पथके नेमली गेली. दोन मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले. या दोन मुली त्यांच्या मिराभाईंदर येथील राहत्या घरी मिळून आल्या. याबाबत उल्हासनगरचे डीपीसी गोरे यांनी सांगितले की, या सहा पैकी काही मुली मिराभाईंदर, काही मुली ठाणे तर काही मुली मुंबईतील आहेत. घटनेच्या दिवशी या सहा पैकी काही मुली मेन गेटची चावी असलेल्या रुममध्ये गेल्या.
Maratha Reservation : 'मराठा आरक्षण कुणाचंही कमी करून देणार नाही'; उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य
तिथून त्यांनी चावी मिळवली. यावेळी या ठिकाणी नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक हे जेवण करण्यासाठी गेले होते. याच संधीचा फायदा या मुलींनी घेतला. चावी हाती लागल्यानंतर त्या मने गेट उघडून पळून गेल्या. ज्या दोन मुली पोलिसांना सापडल्या त्यांनी सांगितले की, त्यांना या सुधारगृहात राहायचे नाही. अजून चार मुलींचा शोध सुरु आहे. त्यांचाही लवकरच शोधून काढणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र सुधारगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.