Umred MIDC Blast : नागपूर जिल्हातील उमरेड MIDC मधील अॅल्युमिनियम पावडर आणि अॅल्युमिनियम फॉइल तयार करणाऱ्या कंपनीत 11 एप्रिल रोजी स्फोट झाला होता. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आह. स्फोट झालेल्या कंपनी परिसरात तीन मृतदेह आढळून आले आहेत. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन जणांपैकी दोन जणांचा आज मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी यासंदर्भातील माहिती दिली. अद्याप स्फोटाचं कारण कळू शकलेलं नाही. तरी यासंदर्भातील तपास सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे.