- हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तान मिर्झाने PM मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतीची याचना केलीय
- 1996 साली मामाच्या मुलासोबत जबरदस्तीने लग्न लावल्याचा आरोप
- मामाच्या मुलाने अनेकदा बलात्कार केल्याचा हसीन मस्तान मिर्झाचा दावा
Haseen Mastan Mirza: अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तान मिर्झाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतीची याचना केलीय. हसीन मस्तान मिर्झाने दावा केलाय की,1996मध्ये मामाच्या मुलासोबत तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं त्यावेळेस ती अल्पवयीन होती. असे असतानाही तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आला. मामाच्या मुलाने तिची मालमत्ता बळकावण्यासाठी तिची ओळखही चोरल्याचा आरोप हसीनने केलाय. आपल्याशी लग्न करण्यापूर्वी मामाच्या मुलाने तब्बल आठ वेळा लग्न केल्याचा धक्कादायक दावाही हसीनने केलाय.
डॉनच्या लेकीने PM मोदींना केले हे आवाहन
डॉन हाजी मस्तानची लेक असल्याचा दावा करणाऱ्या हसीनने सांगितलं की, अल्पवयीन असताना लग्नासाठी दबाव आणल्याने मानसिक धक्का बसला होता. यामुळे तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही तिचे म्हणणंय. हसीन मस्तान मिर्झाने ANI वृत्तसंस्थेशी बातचित करताना म्हटलं की, "मी PM मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आवाहन केलंय की रोज इतक्या घटना घडतायेत. ज्याप्रमाणे माझ्यासोबत घडलं, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, बालविवाह, माझी मालमत्ता हिसकावण्यात आली आणि माझी ओळख लपवण्यात आली. म्हणून मला अस वाटतं की जर कायदे कठोर असेल तर लोक गुन्हे करण्यास घाबरतील."
तिहेरी तलाक कायद्याचे कौतुक
यापूर्वी हसीनने सोशल मीडियावरील व्हिडीओ पोस्टमध्ये न्याय मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केलाय. व्हिडीओमध्ये तिने पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आवाहन केलंय की, वर्षानुवर्षे ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तिहेरी तलाक कायद्याचेही तिने कौतुक केले, पण अशा प्रकरणांमध्ये त्वरित न्याय मिळावा यासाठी कायदे कठोर करण्याचीही मागणी केलीय आणि इस्लाममध्ये या धार्मिक कायद्याचा गैरवापर होत असल्याचे सांगितले. हसीनने सांगितलं की, "तिहेरी तलाक कायदा खूप चांगला आहे. इस्लाममध्ये तिहेरी तलाकचा गैरवापर होत होता, मोदीजींनी ज्या पद्धतीने विधेयक मंजूर केले आणि महिलांना अशा कायद्यापासून मुक्तता मिळवून दिली".
(नक्की वाचा: Viral News: 14 वर्षाच्या सख्ख्या भावापासून प्रेग्नेंट राहील 16 वर्षाची बहीण, बाळ जन्मताच जे केलं ते अतिशय भयंकर)
'मी त्या व्यक्तीला शिक्षा देऊ इच्छिते ज्याने...'
1996 रोजी मामेभावासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा आरोप हसीनने केलाय. जबरदस्तीने लावून देण्यात आलेल्या लग्नाबाबत हसीनने म्हटलंय की, "मी त्या व्यक्तीला शिक्षा देऊ इच्छिते की ज्याने इतके गुन्हे केले आहेत, एका मुलीवर बलात्कार केलाय, तिला मरण्यासाठी सोडून दिले. पोलीसही विचारत होते, 'तू त्यावेळेस काय करत होतीस?' आज मी मोठी झालेय आणि कोणीही मला पाठिंबा देत नाहीय. तेव्हा मी वयाने लहान होते. मला घराबाहेर काढण्यात आले तेव्हा कोणीही मला पाठिंबा दिला नाही".
(नक्की वाचा: Vaishnavi Neel Murder: गळा चिरलेला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती; 4 तासांत आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर)
हसीन मस्तानने लोकांनाही आवाहन केलंय की, तिच्या वडिलांना या प्रकरणात ओढू नये. कारण ही तिची वैयक्तिक बाब आहे, जी वडिलांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी घडली. दरम्यान मुंबईचा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानचा 25 जून 1994 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.