केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या नातीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बिहारमधील गया जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. सुषमा देवी असं मांझी यांच्या नातीचं नाव आहे. त्या अतरी ब्लॉकमध्ये विकास मित्र म्हणून काम करत होत्या. सुषमा देवी यांच्या पती रमेश यांच्यावर या हत्येचा आरोप करण्यात येत आहे. आरोपी रमेश ट्रक ड्रायव्हर आहे. दुपारी बाराच्या सुमारास ही हत्या झाली. आरोपी पतीनं घरामध्येच पत्नीला गोळी मारली आणि तो देसी कट्टा फेकून फरार झाला, असा आरोप आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
14 वर्षांपूर्वी झालं होतं आंतरजातीय लग्न
या दोघांनी 14 वर्षांपूर्वी आंतरराजातीय लग्न केलं होतं. ही घटना घडली त्यावेळी मृत सुषमा यांची बहीण आणि मुलं घरातील दुसऱ्या खोलीत होते. गोळीचा आवाज ऐकल्यानंतर ते तिथं पोहोचले. या आवाजानं शेजारचे लोकांनीही सुषमा यांच्या घरी धाव घेतली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
( नक्की वाचा : अडीच वर्षात 25 वेळा आई बनली महिला! 5 वेळा झाली नसबंदी, वाचा काय आहे प्रकार? )
गयाचे SSP आनंद कुमार यांनी सांगितलं की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी नीमचक बथानीचे SDPO प्रकाश कुमार आणि SSP अन्वर जावेद यांच्या नेतृत्त्वाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीम आणि तज्ज्ञांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.