IIT Powai : विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात? गुप्तहेराचे 14 दिवस वसतिगृहात बेकायदेशीर वास्तव्य, लेक्चर्सना हजेरी

मुंबई पवई आयआटीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

मुंबई पवई आयआटीमधून (Spying at IIT Powai) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अज्ञान व्यक्तीकडून हेरगिरी केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली असून पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. 

पवई  IIT मध्ये हेरगिरीचा प्रकार ....

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींकडून पवई  IIT (IIT Powai) मध्ये 14 दिवस बेकायदेशीर वास्तव केल्याचा प्रकार समोर आला आहे. बिलाल अहमद फय्याज अहमद तेली (22) असं या तरुणाचं नाव असल्याचं तपासात समोर आलं आहे. हा तरुण कर्नाटक मंगळुरूचा रहिवाशी असल्याची सूत्रांची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे तेलीने आयआयटीमधील वर्गांमध्ये जाऊन बसला. इथले लेक्चर्सना हजेरी लावली आणि इथल्या वसतिगृहात राहत होता. या प्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

नक्की वाचा - Mumbra Local Train Accident : तो प्रवासी अपघातासाठी कारणीभूत? दोन्ही लोकलमध्ये होते अवघे 0.75 मीटरचं अंतर

या तरुणाची NIA आणि  IB च्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी केली जात आहे. हा तरुण कॅम्पस परिसरात एकटाच फिरत असताना सुरक्षा रक्षकांना संशय आला. त्यांनी या तरुणाकडे आयकार्ड मागितले असता त्याने तिथून पळ काढला अशी माहिती समोर आली आहे. काही अंतरावर सुरक्षा रक्षकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. 

Advertisement
Topics mentioned in this article