'पतीचे पत्नीबरोबर अनैसर्गिक संबध बलात्कार नाही' उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

जाहिरात
Read Time: 2 mins
भोपाळ:

पतीने पत्नीबरोबर अनैसर्गिक संबध, म्हणजे बलात्कार होत नाही. शिवाय ते संबध ठेवण्यासाठी संमतीची आवश्यकता नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.  शिवाय अशा संबधामध्ये पत्नीची संमती महत्वाची नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. आपल्या देशात वैवाहिक बलात्करा म्हणजेच मॅरिटल रेप हा गुन्हा होत नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कायदा काय सांगतो 

वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही. न्यायमुर्ती गुरपाल सिंह अहलूवालिया यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले आहे. विवाहानंतर पती आणि पत्नी हे एकत्र राहात असतात. त्यानंतर पतीने पत्नी बरोबर शरीर संबध ठेवले तर त्याला बलात्कार म्हणता येत नाही. याला केवळ कलम 376 ब हे अपवाद आहे. यानुसार जर पती पत्नी कायदेशीर पद्धतीने वेगळे झाले असतील, त्यानंतरही पतीने असे कृत्य केले तर त्याला मात्र बलात्कार म्हणता येतो असे हे कलम सांगतेल. लाईव्ह लॉच्या सुत्रानुसार  मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं आहे. त्यानुसार कोणत्याही पतीने त्याच्या पत्नीबरोबर शरीरसंबंध निर्माण केल्यास त्याला बलात्कार म्हणू नये. असे स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा - 'महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचा हात, मला लटकवण्याचा प्रयत्न'

...तर पतीच्या विरोधात तक्रार करता येत नाही 

या प्रकरणात एका महिलेने तीच्या पतीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून पती विरोधात बलात्काराचा गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. त्यावर मध्यप्रदेश उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. पत्नीने पतीवर अनैसर्गिक संबध प्रस्थापित करत असल्याचा आरोप केला होता. तसे पाहाता एखाद्या महिलेच्या सहमतीशिवाय शरीरसंबध प्रस्थापित करता येत नाहीत. तसं केल्यास तो गुन्हा ठरतो. पण जर विवाह झाला असेल. पती पत्नी एकत्र राहात असतील. त्यावेळी दोघात संबध झाले तर ती महिला पत्नी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकत नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. 

Advertisement