Shocking News: नात्यांना लाजणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये उघड झाली आहे. प्रेमसंबंधांवरून सुरू असलेल्या वादात, एका 2 मुलांच्या आईने पोलीस चौकीतच आपल्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे महिलेचे प्रेमसंबंध तिच्यापेक्षा 15 वर्षे लहान असलेल्या आणि तिच्या भाच्यासोबत होते. या अचानक झालेल्या कृत्यामुळे पोलीस कर्मचारीही स्तब्ध झाले. त्यांनी तातडीने महिलेला उपचारांसाठी लखनऊ येथे हलवावे लागले.
काय आहे प्रकरण?
सीतापूर जिल्ह्यातील पिसावा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुतुबनगर चौकीमध्ये ही घटना घडली. पूजा मिश्रा आणि तिचा भाचा आलोक मिश्रा यांना त्यांच्यातील प्रेमसंबंधांवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादावर तोडगा काढण्यासाठी पोलीस चौकीत बोलावण्यात आले होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जेव्हा आलोक मिश्राने पूजासोबतचे नाते पुढे सुरू ठेवण्यास स्पष्ट नकार दिला, तेव्हा पूजाला मोठा धक्का बसला.
भाच्याने संबंध तोडल्याच्या निराशेमध्ये आणि हताश होऊन पूजाने अचानक ब्लेडने स्वतःच्या हाताची नस कापून टाकली. पोलीस चौकीत हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने तिला गंभीर अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी लखनऊ येथे हलवण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ )
15 वर्षांनी लहान भाच्याशी प्रेमसंबंध
पूजा मिश्रा मूळची दिल्लीतील हरीश विहारची रहिवासी आहे. तिचे लग्न गाझियाबाद येथील ललित कुमार मिश्रा यांच्याशी झाले असून त्यांना 2 मुले आहेत (वंश - 7 वर्षे, आणि अंश - 6 वर्षे). ललित मिश्रा यांनी आपल्या कामात मदत करण्यासाठी त्यांचा भाचा आलोक मिश्रा याला आपल्याकडे बोलावले होते. याच दरम्यान, विवाहित पूजा आणि तिच्यापेक्षा तब्बल 15 वर्षांनी लहान असलेल्या आलोक मिश्रा यांच्यात प्रेमसंबंध विकसित झाले.
पती ललित मिश्रा यांना या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी आलोकला तत्काळ तेथून दूर केले. यानंतरच संबंधांवरून वाद सुरू झाले आणि अखेर हे प्रकरण पोलीस चौकीपर्यंत पोहोचले.