Crime News: 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधम आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

ही चकमक देवीखेडा रोड, ऊस संस्थेजवळ, आलमबाग येथे घडली. डीसीपी सेंट्रल आशिष श्रीवास्तव म्हणाले की, घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील आलमबाग पोलीस स्टेशन परिसरात 5 जून रोजी एका ३ वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी आता एक महत्वाची अपडेट समोर आली असून नराधम आरोपी दीपक वर्मा याचा पोलीस चकमकीत एन्काऊंटर करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लखनौमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्याचे समोर आला आहे. लखनऊमधील आलमबाग पोलीस स्टेशन परिसरात 5 जून रोजी 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी ऐशबाग येथील दुडा कॉलनी येथील राधेश्याम वर्मा यांचा मुलगा दीपक वर्मा याला पोलिसांनी चकमकीत ठार मारले. ही चकमक देवीखेडा रोड, ऊस संस्थेजवळ, आलमबाग येथे घडली. डीसीपी सेंट्रल आशिष श्रीवास्तव म्हणाले की, घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली.

आरोपीला पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, ज्यामध्ये एक स्कूटी दिसली. स्कूटीच्या ओळखीच्या आधारे पोलिसांनी आरोपी दीपक वर्मा याचा शोध घेतला. चकमकीदरम्यान दीपक वर्माला गोळी लागली, त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्याकडून शस्त्रे, स्कूटी आणि काडतुसे जप्त केली.

ट्रेंडिंग बातमी - Political News : "उद्धव साहेब एक फोन करा, आम्ही तयार आहोत", युतीच्या चर्चेवर मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य

हजरतगंज पोलीस ठाण्यात आरोपी दीपक वर्माविरुद्ध आधीच गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून आरोपीवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या घटनेमुळे आलमबाग परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, कारण मार्च 2025 मध्येही आलमबाग बस स्टँडजवळ एका ऑटो चालक आणि त्याच्या भावाने एका मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती.

Advertisement

मोठ्या शहरांमध्ये रात्री गस्त घालली जाते असा दावा यूपी पोलिस करतात, परंतु अशा घटना पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे आणि तपास जलद केला जाईल असे म्हटले आहे. दरम्यान,   सध्या पीडितेवर केजीएमयूमध्ये उपचार सुरू आहेत, जिथे तिच्यावर 5 जूनच्या रात्री शस्त्रक्रिया झाली असावी. 

ट्रेंडिंग बातमी - Shocking news: DJ च्या आवाजाने मुलीला आला हार्ट अटॅक, ती तडफत राहिली, रुग्णालय पाहात राहिलं, शेवटी...