10 दिवसात राजीनामा द्या अन्यथा..., योगी आदित्यनाथांना मुंबईत धमकीचा फोन

शनिवारी सायंकाळी आलेल्या या धमकीवजा कॉलमुळे मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा धमकी (Threatening call to Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यंदा त्यांना मुंबई पोलीस कंट्रोल रुमच्या फोन नंबरवर धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने दहा दिवसांच्या आत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरुन राजीनामा देण्याचं आव्हान केलं आहे. असं न केल्यास बाबा सिद्दीकीप्रमाणे मारलं जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी आलेल्या या धमकीवजा कॉलमुळे मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. 

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून आलेल्या कॉलचा तपास केला जाक आहे. राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने घेतली होती. 

नक्की वाचा - खळबळजनक! एअर इंडियाच्या विमानात सापडली काडतुसे आणि गन पावडर

मार्चमध्येही आला होता धमकीचा फोन...
यापूर्वी या वर्षीच्या मार्च महिन्यात लखनऊच्या महानगर येथील नियंत्रण कक्ष सुरक्षा मुख्यालयात शनिवारी रात्री फोन करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. ड्यूटीवर तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साधारण १० वाजता एका नंबरवर कॉल आला होता. एका तरुणाने फोन करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. याशिवाय २०२३ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीराम मंदिर आणि उत्तर प्रदेश एसटीएफच्या प्रमुखांना बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी दिली होती. डीजीपी मुख्यालय आणि एसटीएफ मुख्यालयाच्या कंट्रोल रूममध्ये धमकीचा फोन आला होता.