निळ्या ड्रमनंतर सुटकेस कांड ! मामीनं भाच्यासोबत नवऱ्याचे तुकडे केले, वाचून येईल अंगावर काटा

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Uttar Pradesh Crime News : मेरठमध्ये निळ्या ड्रममध्ये झालेलं हत्याकांड अजूनही कुणी विसरलेलं नाही. त्यानंतर उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये एक धक्कादायक घटना उघड झालीय. इथं रजिया सुल्तान या महिलेनं तिच्या प्रियकरासोबत (जो तिचा भाचा आहे ) नवरा नौशादची हत्या केली. रजियानं धारधार शस्त्रानं नौशादची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन ते 60 किलोमीटर दूर निर्जन शेतामध्ये फेकून दिले. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेनं सर्वांनाच धक्का बसलाय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

30 वर्षांचा नौशाद सौदी अरेबियामध्ये मोलमजुरी करुन घर चालवत होता. तो आठवडाभरापूर्वीच मायदेशी परतला. त्यानं घरी येताना दोन सुटकेस आणल्या होत्या. पण त्याची पत्नी रजिया तिचा भाचा रुमानच्या प्रेमात पडलीय हे त्याला माहिती नव्हतं.

नौशाद घरी परतल्यावर त्याचा आपल्या प्रेमात अडथळा येतोय, असं दोघांना वाटलं. त्यानंतर मामी आणि भाच्यानं मिळून नौशादला मारुन टाकलं. त्यानंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये पॅक करुन पकडी छापर पठखौली गावातील शेतामध्ये फेकून दिला. 

( नक्की वाचा : Meerut Murder Case : पतीला ठार मारणारी मुस्कान Pregnant, वाचा काय आहेत गर्भवती महिलांसाठी जेलचे नियम )
 

गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये सुटकेल पाहिली, त्यानंतर त्यांनी त्याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी सुटकेस उघडली तर आतमध्ये नौशादचा मृतदेह होता. त्याच्या डोक्यावर जखमेचे व्रण होते. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर रजिया आणि रुमामच्या प्रेमसंबंधांची त्यांना माहिती समजली.

Advertisement

रजियाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. त्या चौकशीमध्ये तिनं सर्व सत्य सांगून टाकलं. पोलिसांनी या हत्येमध्ये वापरलेलं शस्त्र देखील जप्त केलंय. रजियाला या हत्येत मदत करणारा प्रियकर रुमान सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

Topics mentioned in this article