बाप झोपेत, 17 वर्षाच्या लेकीने गळा चिरला, भावावर हातोडा चालवला, तिने असं का केलं?

12वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचे भयंकर कृत्य समोर आले आहे. त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे. ज्याने जन्म दिला त्यालाच या अल्पवयीन मुलीने संपवले. शिवाय संपुर्ण कुटुंबालाही संपवण्याचा कट रचला.

जाहिरात
Read Time: 3 mins
कन्नौज में बेटी ने की पिता की निर्मम हत्या.
कन्नौज, उत्तर प्रदेश:

तिचं वय अवघं 17 वर्षांचं. पण तिने केलेला गुन्हा ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्या शिवाय राहाणार नाही. तिने बापाचा गळा कापला. त्यानंतर भावावर हातोड्याने वार केले. 12वीत शिकणाऱ्या या मुलीनं मोठ मोठ्या गुन्हेगारांनाही गुन्हा करण्यात पाठीमागे सोडले आहे, असेच म्हणावे लागेल. ही घटना उत्तरप्रदेशच्या कन्नौज इथे घडली आहे. तेच कन्नौज जे जगभरात अत्तरासाठी प्रसिद्ध आहे. त्याच कन्नौजच्या मुलीचे हात आज बापाच्या खुनाने रंगले आहेत. इथे एका अल्पवयीन मुलीने झोपत असलेल्या आपल्या बापाला कायमचे झोपवले. या हैवान मुलीचे तेवढ्यानेच पोट भरले नाही तर तिने आपल्या भावावरही हातोड्याने वार करत त्यालाही ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे नशिब चांगले म्हणून तो बचावला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भावावर चालवला हातोडा 

अल्पवयीन मुलीच्या मानगुटीवर प्रेमाचं भूत असं काही बसलं होतं की त्यात ती तिची सुद्ध हरवून बसली होती. ज्या बापाने तिला बोटाला धरून चालायला शिकवलं. खाद्यावर बसवून हे जग दाखवलं. त्याच बापाचा लेकीने खुन केला. हा खुन करण्यासाठी तिला साथ दिली ती तिच्या प्रियकराने. सोमवारी रात्री 17 वर्षाच्या निधीने रात्री बापाची हत्या केली. त्यानंतर तिने घरातल्या अन्य सदस्यांनाही मारण्याचा कट रचला होता. मात्र ती पकडली गेली. 

Advertisement

हेही वाचा - वॉटरपार्कमध्ये जाण्याचा हट्ट, मामाने भाच्यांना धरणावर नेले, पुढे भयंकर घडले

प्रेमाला घरातून होता विरोध 

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मुलीच्या प्रेमाला घरातून विरोध होता. या विरोधात या मुलीने मोठे पाऊल उचलत सर्वांनाच संपवण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या प्रेमाची माहिती तिच्या वडीलांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तिला समजावून सांगण्यात आले. शिवाय तिला ओरडही मिळाला. त्यानंतर तिच्यावर निर्बंधही लावण्यात आले. या सर्व गोष्टींना कंटाळून शेवटी तिने आपल्या प्रेमी बरोबर मिळून सर्व कुटुंबालाच संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने सोमवारी रात्री सर्वांच्या जेवणात विष मिळवले. जेवण केल्यानंतर घरातले सर्वजण बेशुद्ध झाले. त्यानंतर तिने आपल्या प्रेमीला फोन करून घरी बोलवून घेतले. प्रेमी घरी आल्यानंतर तिने आधी बापाचा धारधार ब्लेडने गळा कापला. त्यानंतर भावावर हातोड्याने वार केला. त्याच वेळी भावाला जाग आली. त्याने तातडीने आपल्या जखमी वडीलांना दवाखान्यात नेले. मात्र तिथे त्यांना मृत म्हणून घोषीत करण्यात आले.  

Advertisement

हेही वाचा - मुंबईतील एका श्रीमंत 'भिकारी'चा हत्येनं शेवट, मृत्यूपूर्वी कुटुंबाला दिलं आलिशान आयुष्य

घरातल्या कुत्र्यालाही दिले विष 

या संपुर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे कन्नौजचे पोलिस अधिक्षक अमितकुमार आनंद यांनी सांगितले. प्रथमदर्शनी ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या अल्पवयी मुलीने घरच्यांना मारण्याचे ठरवलेच होते. पण तिने घरातल्या कुत्र्यालाही विष दिले होते. त्यामुळे तो कुत्राही सकाळपर्यंत बेशुद्ध होता. दरम्यान घरातले लोकही विषारी जेवण खाल्ल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आरोपी अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

Advertisement