जाहिरात
Story ProgressBack

वॉटरपार्कमध्ये जाण्याचा हट्ट, मामाने भाच्यांना धरणावर नेले, पुढे भयंकर घडले

उन्हाळ्याची सुट्टी काहींच्या जिवावर बेतली आहे. अशीच एक सर्वांना हादरवून सोडणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Read Time: 2 mins
वॉटरपार्कमध्ये जाण्याचा हट्ट, मामाने भाच्यांना धरणावर नेले, पुढे भयंकर घडले
नाशिक:

सध्या सुट्टीचा हंगाम आहे. सर्वच जण फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. अनेक जण मामाच्या गावाला जाणे पसंत करत आहेत. मात्र ही सुट्टी काहींच्या जिवावर बेतली आहे. अशीच एक सर्वांना हादरवून सोडणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. शेख कुटुंबातील पाच जणांना एकाच वेळी जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नाशिकच्या शेख कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या पाच जणांच्या मृत्यू मागचा घटनाक्रम सर्वांनाच हादरवून सोडेल असेच आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वॉटरपार्कसाठी पैसे नाही म्हणून धरणावर गेले 

नाशिकच्या गोसावी वाडीतील हनिप शेख राहात होते. उन्हाच्या झळा लागत असल्याने त्यांच्या भाच्यांनी त्यांच्याकडे   पोहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मामाने शिर्डी वाटर पार्कमध्ये जाण्याचा प्लॅन केला होता. मात्र तिथलं तिकीट महाग होतं. मग स्विमिंग पुलमध्ये जाण्याचे ठरले. पण तिथे घालावा लागणारा पोशाख त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे तेही बारगळलं. मग मानाने इगतपुरीच्या बाहुली धरणावर जाण्याचे ठरवले. भाचे मंडळीही पोहायला मिळणार म्हणन खुश झाले. एकाच रिक्षाने लहान मुलांसह नऊ जण धरणाकडे गेले. 

हेही वाचा - पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीचा फास आवळणार!

घरी चला म्हणून तिची हाक 

हे सर्व जण धरणावर पोहोचले. त्यावेळी धरणात जास्त पाणी नव्हते. त्यावेळी ते परत फिरण्याच्या तयारीत होते. पण एका ठिकाणी त्यांना पाणी दिसले. मुलांची आई त्यांना पाण्यात जाऊ नका म्हणून सांगत होती. पण त्यातील कुणीह ऐकले नाही. आई रिक्षात बसण्यासाठी निघून गेली. त्याच वेळी मामासह मुलं पाण्यात गेली. पाण्यात गेल्यानंतर एकाचा पाय खोल पाण्यात रूतला. हे पाहाता काठावर असलेली मुले एका मागोमाग खोल पाण्यात गेली. पाहाता पाहाता मामासह पाच जण पाण्यात बुडाले. 

हेही वाचा - माजी मंत्र्याच्या पत्नीच्या ट्वीटने पुणे अपघातात ट्विस्ट, आणखी एक बाजू आली समोर

मुलांच्या आईचा टाहो 

मुलांचा आवाज येत नाही हे काही वेळाने रिक्षात बसलेल्या आईच्या लक्षात आले. त्यावेळी त्या बाहेर आल्यात. डोहात काही तरी बुडताना दिसत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर अजूबाजूला असलेले लोक धावत आले. त्यांनी पाण्यात उडी घेत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यात दोन मुली दोन लहान मुलं आणि मामा या पाच जणांचा समावेश होता.  

हेही वाचा - 14 वर्षाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन नाकारला

नाशिकच्या गोसावीवाडीवर शोककळा 

मृत हनीफ शेख हा यामुलांचा मामा होता. तो भाच्यांसह नाशिकच्या गोसावीवाडीत राहात होता. संपुर्ण कुटुंब एकत्र या भागात राहात होते. हसतं खळतं कुटुंब एका क्षणात उद्धस्त झालं. मुलांना घरी चला सांगत असतानाही ते पाण्यात गेले. आपलं संपुर्ण कुटुंब संपलं असा टाहो मुलांच्या आईने फोडला होता. या घटनेनंतर सर्वच जण हादरू गेले आहेत.  

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
दोन बसची समोरासमोर जोरदार टक्कर, अपघातात 20 जखमी 3 जण गंभीर
वॉटरपार्कमध्ये जाण्याचा हट्ट, मामाने भाच्यांना धरणावर नेले, पुढे भयंकर घडले
New RTO Rule for driving license from june 1
Next Article
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, 1 जूनपासून लागू होणार नवा नियम
;