धोका ! मुलगी दाखवली आणि तिच्या आईशी लग्न लावलं, पीडित तरुणानं सांगितला धक्कादायक अनुभव

Bride Swap News : आपली फसवणूक करुन 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या विधवा महिलेशी लग्न लावून दिल्याचा आरोप पीडित तरुणानं केलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

Bride Swap : उत्तर प्रदेश सध्या नातेसंबंधामधील धक्कादायक घटनांमुळे चर्चेत आहे. मेरठमधील मुस्कान या विवाहित महिलेनं तिच्या प्रियकरासोबत नवऱ्याची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. मुस्काननं सौरभ राजपूत या त्याच्या नवऱ्याचे 15 तुकडे केले. ते एका ड्रममध्ये भरले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये लग्न ठरलेला मुलगा त्याच्या होणाऱ्या सासूसोबत पळून गेल्याचं उघड झालं. आता पुन्हा मुस्कानच्या मेरठमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुस्कानच्या मेरठमधूनच आणखी एक प्रकरण समोर आलंय. मेरठमध्ये एका तरुणानं त्याचा मोठा भाऊ आणि वहिनीनं आपली फसवणूक करुन 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या विधवा महिलेशी लग्न लावून दिल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात आपण विरोध केला तर आपल्याला अत्याचार केल्याच्या खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी देण्यात आली, असं त्यानं सांगितलं. हा तरुण आता मेरठ पोलिसांकडं मदतीची याचना करत आहे.

काय आहे प्रकरण?

अजीम असं पीडित तरुणाचं नाव आहे. अजीमच्या आई-वडिलांचं निधन झालंय. तो त्याचा मोठा भाऊ नदीम आणि वहिनी शायदासोबत राहतो. अजीमच्या आरोपानुसार त्याला ईदच्या दिवशी (31 मार्च 2025) वहिनी शायदानं फाजलपूरमध्ये बोलवालं. माझं लग्न तिची मोठी विधवा बहीण ताहिराची मुलगी मंताशाबरोबर करण्याचं आश्वासन वहिनीनं दिलं होतं. अजीम वहिनीवर विश्वास ठेवून फाजलपूरला गेला. 

( नक्की वाचा : Meerut Murder Case : पतीला ठार मारणारी मुस्कान Pregnant, वाचा काय आहेत गर्भवती महिलांसाठी जेलचे नियम )
 

मला मुलगी दाखवण्यात आली. तिला पाहून मी लग्नाला होकार दिला. त्याच संध्याकाळी माझं लग्न निश्चित झालं. फाजलपूरच्या मशिदीमध्ये लग्न ठरलं. लग्नाच्या वेळी मौलाना निकाह वाचत असताना मला आपलं लग्न मंताशासोबत नाही तर तिची विधवा आई ताहिराबरोबर लावलं जात असल्याचं लक्षात आलं,' अशी तक्रार अजीमनं केलीय.

Advertisement

आपण या लग्नाला विरोध केला तर आपल्याविरुद्ध बलात्काराची तक्रार करु अशी धमकी देण्यात आली असं अजीमनं पोलिसांना केलेल्या तक्रारीत सांगितलं आहे. 

Topics mentioned in this article