Nora Fatehi : बायकोनं नोरा फतेही सारखं दिसावं म्हणून 3 तास जिम करायला लावायचा नवरा ! वाचा काय आहे प्रकरण?

महिलेने आरोप केला आहे की, तिच्या नवऱ्याला इतर मुलींमध्ये खूप रस आहे आणि तो सोशल मीडियावर मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाहतो.

जाहिरात
Read Time: 3 mins
Nora Fatehi : पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिच्या नवऱ्याची इच्छा आहे की तिने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीसारखं दिसावं.
मुंबई:

Nora Fatehi connection in wife husband dispute :  तुमचा नवरा तुम्हाला एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीसारखं दिसावं. तिच्यासारखी फिगर असावं म्हणून रोज 3 तास व्यायाम करायला लावत असेल, तर बायको म्हणून तुम्ही काय कराल? बायकोने त्याला नकार दिला तर तिला उपाशी ठेवण्यापर्यंत तिचे हाल करत असेल, तर अशा परिस्थितीत कोणतीही पत्नी आपल्या नवऱ्याचा हा हट्ट का मानेल? तुम्ही म्हणाल, अशा नवऱ्याच्या विरोधात लगेच पोलिसांत तक्रार दाखल केली पाहिजे. तुमचे म्हणणे बरोबर आहे. गाझियाबादमधील एका प्रकरणात एका पीडित पत्नीने असेच केले. तिने आपल्या विक्षिप्त नवऱ्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

या तक्रारीत पीडित पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिच्या नवऱ्याची इच्छा आहे की तिने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीसारखं दिसावं. यासाठी तो पत्नीवर रोज 3 तास व्यायाम करण्यासाठी दबाव टाकत होता. नवऱ्याच्या या हट्टामुळे वैतागलेल्या पत्नीने पोलिसांना याची माहिती दिली.

पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, तिची उंची आणि रंग सामान्य असूनही तिच्या शारीरिक बांधणीवरून तिला सतत टोमणे मारले जातात. महिलेने आरोप केला आहे की, तिच्या नवऱ्याला इतर मुलींमध्ये खूप रस आहे आणि तो सोशल मीडियावर मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाहतो. तिनं केलेल्या तक्रारीनुसार, महिलेचा नवरा आणि सासरचे लोक तिला रोज 3 तास व्यायाम करायला लावतात. जर ती एखाद्या दिवशी 3 तास व्यायाम करू शकली नाही, तर तिला जेवण दिले जात नाही. 

( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )
 

तिचा नवरा आणि सासरच्या लोकांची इच्छा आहे की तिचे शरीर नोरा फतेहीसारखे व्हावे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेचा नवरा, सासू, सासरा आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

पीडित महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत तिचा पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने गाझियाबादच्या महिला पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, 6 मार्च 2025 रोजी तिचे लग्न मेरठ येथील एका तरुणाशी झाले होते. हे एक ठरवून केलेले लग्न (arranged marriage) होते. लग्नात मुलीच्या बाजूने 16 लाख रुपयांचे दागिने, 24 लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि 10 लाख रुपये रोख स्वरूपात सासरच्या मंडळींना दिले होते. महिलेच्या तक्रारीनुसार, लग्नात जवळपास 76 लाख रुपये खर्च झाले होते.

( नक्की वाचा : 'आईनं 2 पेग घेतले ..', अलवरच्या ‘मुस्कान'ने प्रियकरासोबत पतीची केली हत्या, 8 वर्षांच्या मुलानं सांगितलं रहस्य )
 

महिलेने आरोप केला आहे की, लग्नानंतर तिचे सासरचे लोक तिला आणि तिच्या पतीला एकत्र बाहेर जाऊ देत नव्हते. तिच्या सासूने तिला घरगुती कामांवरून विनाकारण त्रास दिला. एका रात्री तिचा नवरा घरी आला तेव्हा त्याला खोलीत मच्छरदाणी दिसली नाही, यावरून तो खूप संतापला आणि त्याने तिच्यासोबत मारामारी देखील केली.
 

Advertisement
Topics mentioned in this article