घरात पाळलेल्या कोणत्याही प्राण्यावर प्राणीपालकांचा अत्यंत जीव असतो. तो प्राणीदेखील आपल्या मालकावर जीवापाड प्रेम करतो. अनेकदा आपल्या प्राण्याचा विचार करून सर्व प्लान आखले जातात. तो घरातील एक महत्त्वाचा सदस्य होतो. मात्र हाच सदस्य जर दूर झाला तर प्राणीपालकांना खूप जड जातं. उत्तर प्रदेशातील एक महिलेने यातच टोकाचं पाऊल उचलल्याचं वृत्त आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये एका महिलेच्या घरातील पाळीव मांजरीचा अचानक मृत्यू झाला. यानंतर तब्बल तीन दिवस महिला मृत मांजरीसोबत राहिली. मांजरीच्या मृत्यूनंतर दु:खात महिलेने तिसऱ्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. आपल्या मुलीने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातल्या अमरोह्यात पाळलेल्या मांजरीचा मृत्यू झाल्यामुळे एका महिलेनं आत्महत्या करत स्वत:ला संपवलंय. महिलेचं नाव पुजा देवी असं आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर फिरत असलेली मांजर पुजा देवीनं घरी आणली. तिला खाऊ पिऊ घातलं. तिची काळजी घेतली. पण काही दिवसातच मांजरीचा अचानक मृत्यू झाला. घरच्यांनी शेजारच्यांनी मांजरीचा अंतविधी करायचं ठरवलं, पण पुजा देवीनं त्याला विरोध केला. उलट त्या पाळलेल्या मांजरीचा मृतदेह तिनं तीन दिवस घरातच ठेवला. ती सगळ्यांना सांगत होती की, मांजर पुन्हा जिवंत होणार आहे. मांजर काही जिवंत झाली नाही पण पुजा देवीचा मृतदेह खोलीत फास घेतलेल्या अवस्थेत मिळाला. मांजरीचा मृतदेह तिच्याच बाजुला पडलेला होता. पुजा देवीचं दहा वर्षापुर्वी लग्न झालं होतं. ती दिल्लीत रहायची. दोन वर्षापुर्वी तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी ती अमरोह्यात आली होती. पुजा देवीला नैराश्यानं ग्रासल्याचं कुटुंबीयांचं म्हणनं आहे.
नक्की वाचा - Shocking Video : थोबाडीत मारलं, पायाला चावली...केस ओढले; प्रॉपर्टीसाठी लेकीकडून आईचा अनन्वित छळ
हेल्पलाइन
वंद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ 9999666555 या help@vandrevalafoundation.com
TISS iCall
022-25521111 (सोमवार ते शनिवारपर्यंत संपर्क - सकाळी 8:00 ते रात्री 10:00 पर्यंत)
(जर तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींपैकी कुणाला आवश्कता असेल तर वरील मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधा)