गुरुप्रसाद दळवी
ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली. तशीच हत्या कुडाळच्या सिद्धिविनायक बिडवलकरची झाली. जस हत्ये पूर्वी संतोष देशमुख यांचा व्हिडीओ काढला गेला, तसाच व्हिडीओ सिद्धिविनायकचा ही काढला गेला. बीडमध्ये घडलं, यापेक्षा भयंकर सिंधुदुर्गात घडलं, असा आरोप आहे, ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केला आहे. शिवाय या हत्येमागचा 'आका' कोण हे शोधा! असं सांगत त्यांनी एक प्रकारे पुन्हा एकदा राणेंकडे बोट केले आहे. ही हत्या प्रकाशात आल्यानंतर सिंधुदुर्गात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हे सगळं प्रकरण जाणून घेण्यासाठी किमान सव्वा दोन वर्षे मागे जावे लागेल. सिद्धिविनायकच्या मारहाणीचा जो व्हिडीओ समोर आला आहे,तो तबल्ल दोन वर्षांपूर्वीचा आहे. या व्हिडीओत कुडाळच्या चेंदवणचा सिद्धिविनायक बिडवलकर दिसतोय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही दिवसातच तो बेपत्ता झाला. ज्याचा कुणालाच सुगावा लागला नाही. अखेरीस तब्बल सव्वा दोन वर्षांनंतर पोलिसांना एक गुप्त माहिती देणारा फोन आला, आणि सिद्धिविनायक बिडवलकरच्या खुनाला वाचा फुटली.
ट्रेंडिंग बातमी - Robert Vadra : रॉबर्ट वाड्राला ईडीकडून समन्स; काय आहे जमीन व्यवहारासंबंधित वाद?
सिद्धिविनायक बिडवलकरने काही जणांकडून 22 हजार रुपये उधार घेतले होते. ते वसूल करण्यासाठी मार्च 2023 मध्ये चार जणांनी त्याचं अपहरण केलं. त्याला तीन दिवस जबर मारहाण केली. त्याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर काय करायचे असा प्रश्न मारेकऱ्यां समोर होता. कुडाळ किंवा अजूबाजूच्या परिसरात मृतदेह फेकल्यास सर्वांना समजेल. म्हणून आरोपींनी तो सावंतवाडीतल्या सातार्ड्यात नेण्याचा निर्णय घेतला. हे गाव दुर्गम ठिकाणी आहे. शिवाय तिथं कुणाला संशय येणार नाही त्यामुळे त्यांनी त्याचा मृतदेह सातार्ड्याच्या स्मशानभूमीत नेला. तिथेच तो मृतदेह जाळला. दुसऱ्या दिवशी त्याची राख, हाड तेरेखोल नदी फेकन दिली.
ट्रेंडिंग बातमी - गाडीत मृतदेह? धावत्या कारमधील लटकलेला हात कुणाचा? 'त्या' VIDEOचे धक्कादायक सत्य
ही सर्व माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली. लोकांसाठी सिद्धिविनायक बेपत्ता होता. पण प्रत्यक्षात त्याची हत्या करुन, त्याच्या मृतदेहाची विल्हेवाटही लागली होती. खून जवळपास पचलाच होता. पण एका निनावी फोनमुळे आरोपींची नावं समोर आली, आणि पोलिसांनी चारही जणांच्या मुसक्या आवळल्या. सिद्धिविनायक बिडवलकर हत्येमध्ये सिद्धेश शिरसाट, गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट, यांचा समावेश आहे. पण त्यातल्या सिद्धेश शिरसाटचा दाखला देत, वैभव नाईक यांनी या हत्येमागे शिंदे गटातल्या एका नेत्याचं कनेक्शन असल्याचा आरोप केला आहे. वैभव नाईकांचा इशारा पुन्हा राणेंकडेच असल्याची चर्चा आहे. सिद्धेश हा राणेंचा कार्यकर्ता असल्याचं समोर येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि राजकीय हत्या हे समीकरण नवं नाही. सिंधुदुर्गातल्या राजकीय हत्यांचा इतिहास आहे. 1991 मध्ये काँग्रेस नेते श्रीधर नाईक यांची हत्या झाली. हत्येच्या अनेक आरोपींमध्ये नारायण राणे यांचं नाव होतं. 2002 मध्ये राष्ट्रवादीचे नेते सत्यविजय भिसेंची हत्या झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंकडे बोट केलं. 2005 मध्ये शिवसेना नेते रमेश गोवेकर बेपत्ता झाले. त्यातही नारायण राणेंच्या हात असल्याचा आरोप झाला. 2009 मध्ये नारायण राणेंचे चुलत बंधू अंकुश राणेंची हत्या झाली. ही हत्या शिवसेनेच्या नेत्यांनी घडवल्याचा राणेंनी आरोप केला. तर राणेंनीच ही हत्या घडवल्याचा आरोप सेना नेत्यांनी केला होता.
यावर आता शिवेसना खासदार संजय राऊत यांनी ही जाब विचारला आहे. सिंधुदुर्गातल्या मारेकऱ्यांचा 'आका' कोण? सिद्धिविनायक बिडवलकरची हत्या राजकीय नसली. तरी या हत्येतल्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप होतोय. याचाच अर्थ वैभव नाईक यांचा इशारा नुकतेच शिंदे गटात सामील झालेल्या निलेश राणे यांच्या दिशेने आहे. हे सांगण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही. असं ही राऊत यावेळी म्हणाले. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पुन्हा एकदा खूनानं हादरला आहे.