पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नसून खून झाल्याचा संशय पोलिसांच्या रिमांड कॉपीमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीकडे वैष्णवीचं बाळ होतं त्या निलेश चव्हाण याच्या घरावर पोलिसांनी छापा मारल्याचं समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निलेश चव्हाण या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर येथील निलेश चव्हाणच्या घरी गेले होते. यावेळी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून कस्पटे कुटुंबीयांना धमकावले. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 351(3) आणि शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
निलेश चव्हाण याचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही उघड झाला आहे. 2019 साली त्याच्यावर पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेऱ्याद्वारे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पोलिसांनी आता त्याच्या पुण्यातील कर्वेनगर परिसरातील घरावर छापा मारून तेथील काही तपासाच्या दृष्टिकोनातून ताब्यात घेण्याची शक्यता आहे. निलेश याचा लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला असून यातून मोठी माहिती समोर येऊ शकते.
कोण आहे निलेश चव्हाण?
निलेश चव्हाणचा बिल्डर असून त्याचा पोकलेन मशीनचा देखील व्यवसाय आहे. निलेश शशांक हा हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती आहे. शशांक आणि वैष्णवी यांच्या वादात देखील तो अनेकदा असायचा. यांच्यातील कौटुंबिक वादामधे तो अनेकदा सहभागी असायचा, अशी माहिती आहे.