जाहिरात

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात खळबळजक ट्वीस्ट! पोलिसांच्या रिमांड कॉपीत हत्येचा संशय, वाचा 12 मोठे मुद्दे

vaishnavi hagawane Death Case Latest Update: धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड कॉपीमध्ये वैष्णवीचा खून झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात खळबळजक ट्वीस्ट! पोलिसांच्या रिमांड कॉपीत हत्येचा संशय, वाचा 12 मोठे मुद्दे

राहुल कुलकर्णी, पुणे:

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे होत असून हगवणे पिता- पुत्रांचे काळे कारनामे उघडकीस येत आहेत. अशातच वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजक ट्वीस्ट आला आहे. वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नसून खून झाल्याचा संशय पोलिसांच्या रिमांड कॉपीमधून व्यक्त करण्यात आला आहे.

(नक्की वाचा: Cannes 2025: बनारसी साडी आणि सिंदूर, ऐश्वर्या रायकडून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी या दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने या दोघांनाही 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड कॉपीमध्ये वैष्णवीचा खून झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

काय आहेत पोलीस रिमांड कॉपीमधील 11 मोठे मुद्दे?

1. वैष्णवी मृत्यू प्रकरणात दाखल असेलला गुन्हा हा महिला अत्याचाराविरुध्दचा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे.

2.  मृत वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळुन आल्या आहेत. त्यावरुन  तिचा खुन केल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच शवविच्छेदनानंतर मूत्युचे कारण death due to ligature compression of neck, with evidence of multiple blunt injuries over body, viscera and articles preserved for chemical analysis असे दिले असुन त्याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त करुन त्या अनुषंगाने पोलिस तपास करणार आहेत. 

3.  मृत वैष्णवीच्या इन्क्वेस्ट पंचनाम्यान्वये दिसत असलेल्या जखमा पाहता त्यांना मारहाण करण्यासाठी वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये एका प्लॅस्टिकची पाईप आहे. आरोपीच्या माहितीवरुन ही मारहाण करण्यात आलेली पाईप जप्त करण्यात आली आहे. 

4.  मृत वैष्णवी हगवणेचा पैशासाठी छळ होत होता. याबाबतही अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी होणार आहे.

5. मृत वैष्णवीच्या लग्नामध्ये हुंड्यात देण्यात आलेली महागडी फॉर्च्युनर गाडी आणि स्कुटी पोलिसांनी जप्त करण्यात आली आहेत. त्यासोबतच आणखी कोणती वाहने हुंड्यात दिली आहेत का याचाही तपास केला जाणार आहे.

(नक्की वाचा: विशाल निकमच्या खऱ्या आयुष्यातील मिस फायर आहे ही अभिनेत्री? त्या कमेंटची होतेय चर्चा)

6.  वैष्णवीला हुंड्यात दिलेले 51 तोळे सोने हे आरोपींनी फेडरेल बँकेमध्ये तारण म्हणुन कोणत्या कारणासाठी ठेवले. सोने तारण ठेवताना वैष्णवीची परवानगी होती की तिचा छळ करुन सोने घेतले? तसेच यामागचा उद्देश काय होता? याचाही तपास होणार आहे. 

7. यातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे यांचे कार्यालय पत्ता भुकुम, ता. मुळशी, जि.पुणे याचे इंटेरियर डिझाईनचे काम महेश परांडे यांनी केले असुन त्याचे पैसे यातील आरोपींनी फिर्यादी यांना देण्यास भाग पाडले आहे. याबाबत आरोपींकडे तपास केला जाणार आहे. 

8.  गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. या 15 दिवसात त्यांनी कोणी आणि कोणत्या स्वरुपाची मदत केली याबाबतचाही तपास पोलीस करणार आहेत.

9. वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणातील आरोपींनी पळून जाण्यासाठी कोणती वाहने वापरली याचाही तपास होणार आहे. 

10. दोन्ही आरोपी 8 दिवस फरार होते. या कालावधीमध्ये त्यांना कोणी आर्थिक मदत केली आहे का? याबाबतही तपास होणार आहे. 

11.  गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी  कोठे कोठे राहण्यास होते तसेच त्या कालावधीत त्यांनी आणखी कोणता गुन्हा केला आहे काय याबाबतही पोलिस तपास करणार आहेत. 

12. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येसोबतच उपस्थित होणाऱ्या अनेक प्रश्नांबाबतही सखोल तपास केला जाणार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com