Vanraj Andekar : सख्ख्या बहिणींनीच केला पुण्यातील माजी नगरसेवकाचा शेवट, गोळीबाराचं धक्कादायक कारण 

गँगस्टर शरद मोहोळ याच्या खुनानंतर पुण्यातील ही दुसरी हत्येची घटना समोर आली आहे.  

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यातील राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावर रविवारी मध्यरात्री हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हे गँगवॉर असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याचे सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. 

माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये वनराजच्या सख्ख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. अखेर याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना अटक करण्यात आली आहे. 

गँगस्टर शरद मोहोळ याच्या खुनानंतर पुण्यातील ही दुसरी हत्येची घटना समोर आली आहे.  राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची वैमनस्यातून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. (Vanraj Andekar Live Video) वनराज रविवारी मध्यरात्री रस्त्यावर निवांत गप्पा मारत उभा होता. त्याचवेळी दहा ते पंधरा जणांच्या टोळीने त्याच्यावर सिनेस्टाईल हल्ला केला. गंभीर बाब म्हणजे टोळीतील किमान पाच जणांच्या हातात बंदुक होती तर बाकीच्यांनी शर्टामध्ये कोयते लपवून आणले होते. या पाचही आरोपींनी अचानक गोळीबार सुरू केला.

Advertisement