Vasai News: अविवाहित सख्ख्या बहीण भावाचे राहत्या घरात टोकाचं पाऊल, भयंकर कारण आलं समोर

मात्र घरातून अचानक दुर्गंधी येवू लागली. त्यामुळे सोसायटीत राहाणारे हैराण झाले. दरवाजाही कुणी उघडत नव्हते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वसई:

एव्हरशाईन सिटी ही उच्चभ्रू सोसायटी वसई पूर्वेला आहे. या सोसायटीतून सर्वांनाच धक्का देणारी घटना समोर आली आहे. या घटनेनं सोसायटी बरोबर संपूर्ण परिसरात सर्वच जण हादरून गेले आहेत. या सोसायटीत हनुमंता श्रीधर प्रसाद आणि यमुना श्रीधर प्रसाद हे सख्खे भाऊ बहिण राहात होते. त्या दोघांचेही मृतदेह या सोसायटीतील त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडले. ज्या वेळी पोलीसांनी याबाबत तपास केला, त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता यात आणखी काही गोष्ठी हातात लागतात का या दृष्टीने पोलीस प्रयत्न करत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हनुमंता श्रीधर प्रसाद याचं वय 40  वर्ष होतं. तर यमुना श्रीधर प्रसाद यांचं वय 45 वर्ष होतं. हे दोघेही सख्खे बहिण भाऊ होते. शिवाय ते अविवाहीत ही होते. वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटीमधील मंगल वंदन सोसायटीमध्ये हे गेल्या अनेक वर्षापासून राहत होते. ही सोसायटी उच्चभ्रू लोकांची सोसायटी म्हणून परिचित आहे. या सोसायटीतल्या फ्लॅटमध्ये हे दोघे राहात होते. गेले काही दिवस त्यांचा फ्लॅटचा दरवाजा हा बंद होता. घरातून ही काही आवाज येत नव्हता. 

ट्रेंडिंग बातमी - Raigad Crime: अरेच्चा! पोलीसच निघाले दरोडेखोर, 1 कोटी 50 लाख लांबवले, पण पुढे...

मात्र घरातून अचानक दुर्गंधी येवू लागली. त्यामुळे सोसायटीत राहाणारे हैराण झाले. दरवाजाही कुणी उघडत नव्हते. त्यामुळे काहींना संशय आला. त्यांनी याची माहिती पोलीसांना दिली. पोलीस तातडीने सोसायटीत दाखल झाले. त्यांनी घराचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा तोडल्यानंतर आत असलेली परिस्थिती पाहून पोलीसही हबकून गेले. फ्लॅटमधील स्थिती भयंकर होती. फ्लॅटच्या बेडरूमध्ये दोघांचे मृतदेह पडले होते. 

ट्रेंडिंग बातमी - Bangkok tourism: बँकॉकला पर्यटक नेमकं कशासाठी जातात? काय आहे तेथील वैशिष्ट्य?

या दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली होती. एकाच सोसायटीत दोघांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. आत्महत्या का केली याचा तपास पोलीसांनी केला. त्यावेळी ते दोघे ही कर्जबाजारी झाले होते ही बाब समोर आली. त्यांच्यावर जवळपास 24 लाखा पेक्षा जास्त रुपयांचे कर्ज होते. ते फेडण्यास ते असमर्थ होते. त्यातून अखेर त्यांनी आपले जीवन संपण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आचोळे पोलीसांनी दिली आहे.